घरमनोरंजन'सत्यमेव जयते' विरोधात तक्रार दाखल!

‘सत्यमेव जयते’ विरोधात तक्रार दाखल!

Subscribe

जॉन अब्राहिमच्या 'सत्यमेव जयते' या नव्या सिनेमाचा ट्रेलर सध्या गाजतो आहे. मात्र, अशातच या सिनेमाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बॉलीवूडचा हँडसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे जॉन अब्राहिम. सध्या जॉन चर्चेत आहे ते त्याच्या ‘सत्यमेव जयते’ या आगामी सिनेमामुळे. सत्यमेव जयतेमध्ये जॉन अब्राहिम, मनोज वाजपयी आणि मराठमोळी अमृता खानविलकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. सोशल मीडियावर अद्याप या ट्रेलरला चाहत्यांची पसंती मिळते आहे. मात्र, नुकतीच या सिनेमाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सत्यमेव जयते सिनेमाची संपूर्ण टीम या तक्रारीमुळे सध्या चिंतेत असल्याचं बोललं जात आहे.

तक्रार काय आणि कुणाची?

28 जून रोजी रिलीज झालेला ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर, रिलीजनंतर काही वेळातच झपाट्याने व्हायरल झाला. लोकांची या ट्रेलरला भरभरुन पसंतही मिळाली. मात्र, दुसरीकडे हैदराबादमधील एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने या ट्रेलरमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सत्यमेव जयते सिनेमाच्या ट्रेलरविरोधात एफआरआय नोंदवून घेण्यात आली आहे. हैदराबादमधील भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या सरचिटणीसांनी ही तक्रार नोंदवली आहे. सिनेमाची कथा भ्रष्टाचाराविरोधात भाष्य करणारी असली तरी, ट्रेलरमध्ये मोहरम सणाला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिनेमाची कथा आणि मोहरम सणाचा काहीही संबंध नसल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. दरम्यान ट्रेलरमधून मोहरमचा सीन त्वरित काढून टाकावा अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -
सत्यमेव जयते सिनेमाचं पोस्टर

सिनेमाची थोडक्यात झलक

सत्यमेव जयते या चित्रपटात जॉनने एका सिरिअल किलरची भूमिका साकारली आहे. मात्र, हा सिरिअल किलर देशात होणाऱ्या भ्रष्टाविरोधात लढा देणारा आहे. पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी त्याची लढाई सुरु होते. या लढाईमध्ये अडथळा आणणाऱ्यांना संपवता संपवता जॉन अखेर खाकी वर्दीच्याच विरोधात उभा राहतो. त्याच्या या संपूर्ण लढ्यामध्ये मनोज वाजपेयीचा देखील एक महत्वाचा रोल आहे. सिरिअल किलर असलेल्या जॉनला शोधणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मनोज वायपेयीने साकारली आहे. ट्रेलर पाहताना आपल्याला मनोज वायपेयी आणि जॉन यांचा दमदार अभिनय पाहायला मिळतो.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -