घरमनोरंजनदिवस रात्र कामाच्या प्रेशरनं आलिया टेन्शनमध्ये! हॉस्पिटलमध्ये केले दाखल

दिवस रात्र कामाच्या प्रेशरनं आलिया टेन्शनमध्ये! हॉस्पिटलमध्ये केले दाखल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आजकाल आपल्या कामामध्ये खूप व्यस्त आहे. एकामागून एक प्रोजेक्ट्सच्या शुटिंगमध्ये ती व्यस्त आहे. याचा तिच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे.सध्या आलिया दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे, त्याच दरम्यान रविवारी आलियाची तब्येत अचानक बिघडली आणि तिला रविवारी एन.एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अलिया परत दुसऱ्या दिवसी हॉस्पिटलमधून गंगूबाई काठियावाडीच्या शूटवर पोहचली. मात्र आलिया रुग्णालयात दाखल झाल्यानंतर चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही माहिती सांगण्यात आली नाही.

गंगूबाई काठियावाडी वादात…

गंगूबाईच्या कुटुंबियांनी २२ डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गंगूबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांना चित्रपटाबद्दल काही आक्षेप आहेत. त्यामुळे आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट वादात सापडला आहे. त्यामुळे गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

गंगूबाईंच्या मुलाच्या मते, झैदीच्या पुस्तकाचे काही भाग बदनामीकारक आहे आणि त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवावे, अशी त्याची इच्छा आहे. त्याचबरोबर गंगूबाई काठियावाडीच्या कुटुंबीयांनीही या चित्रपटासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

आलियाचा हा चित्रपट ११ सितेंबर २०२० रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चित्रपटाची शुटिंग पूर्ण होऊ शकली नाही. मात्र यंदा दिवाळीच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन निर्मात्यांचे आहे. या चित्रपटाशिवाय आलिया भट्ट, अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या आगामी चित्रपटाच्या आरआरआरमध्येही दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -