घरमनोरंजनबिग बॉस मराठी : 'मैत्रीचा ट्रँगल' तुटणार?

बिग बॉस मराठी : ‘मैत्रीचा ट्रँगल’ तुटणार?

Subscribe

‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो सध्या टेलिव्हीजनवर तुफान गाजतो आहे. ड्रामा, इमोशन आणि कॉन्ट्रव्हर्सीने भरलेल्या बिग बॉसच्या घरात रोज नवीन धमाके पाहायला मिळत आहेत. ‘विकेंड का धमाका’ या एपिसोड नंतर आता घरामध्ये एका नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

‘त्या’ तिघांची दोस्ती तुटणार का?

- Advertisement -

बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यापासूनच दोन गट पडले आहेत. त्यातही मेधा घाडे, सई लोकूर आणि पुष्कर जोग या तिघांची खास मैत्री पहिल्या दिवसापासून चांगलीच गाजली आहे. आजवर हे तिघे कायमच एकमेकांच्या पाठीमागे भक्कम उभे राहिले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात पुष्करने सईला मेधा घाडे आणि उषा नाडकर्णी यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला. नेमका हाच मुद्दा महेश मांजरेकरांनी शनिवारच्या ‘विकेंड का वार’ या एपिसोडमध्ये उचलून धरला.

‘यापुढे आता सगळेच माझे स्पर्धक’

- Advertisement -

दरम्यान याप्रकरणी आपण दुखावलो गेलो असल्याची भावना, मेधा हिने शनिवारच्या एपिसोडमध्ये व्यक्त केली. ‘पुष्कर माझ्याविषयी माझ्या पाठीमागे बोलेल, याची अपेक्षा नव्हती’ असे मेधा यावेळी म्हणाली. याविषयी शर्मिष्ठा राऊतकडे आपल्या भावना व्यक्त करताना, ‘यापुढे इथला प्रत्येकजण हा केवळ माझा स्पर्धक असेल. तसंच सई आणि पुष्कर हे दोन बिंडोक मला मित्र म्हणून लाभले आहेत’, अशाप्रकारचे उद्गार मेधाने काढले. यातून मेधा पुष्कर आणि सईवर चांगलीच नाराज झाली असल्याचे दिसत आहे.

फोटो सौजन्य – Voot

‘माफी’ की ‘दुश्मनी’?

बिग बॉसच्या घरातील एखादं भांडण मेधा जितक्या गांभीर्याने घेते, तितक्याच लवकर ते विसरतेही. तिच्या याच ‘स्विच ऑन- स्विच ऑफ’ स्वभावासाठी ती घरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुष्करने केलेले विधान मेधा कितपत ताणणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मेधा पुष्करला माफ करणार? की पुष्कर, मेधा आणि सईच्या ‘फ्रेंडशीप ट्रँगल’मध्ये कायमचा दुरावा येणार? हे आता येणारी वेळच सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -