४६ वर्षीय मलायका म्हणते वॅक्सीन काढा लवकर, ‘वरना जवानी निकल जायेगी’

मलायकाने ही इन्स्टाग्राम स्टोरी गमतीत लिहिली आहे. पण या स्टोरीवरून मलायकाला सेल्फ आयसोलेशन आणि कोरोनाची कंटाळा आला असल्याचे दिसत आहे.

Corona Positive Malaika Arora Says, 'Koi Vaccine Nikal Do Bhai warna jawani nikal jayegi'
४६ वर्षीय मलायका म्हणते वॅक्सीन काढा लवकर, 'वरना जवानी निकल जायेगी'

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनंतर गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिचे देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. याला मलायकाची बहीण अमृता अरोराने दुजोरा दिला होता त्यानंतर मलायकाने देखील सोशल मीडियावर कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. तसेच मलायकाने प्रोटोकॉल अंतर्गत सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. दरम्यान काही तासांपूर्वी मलायकाने एक इन्स्टाग्राम स्टोअरी शेअर केली आहे. मलायका सेल्फ आयसोलेशन आणि कोरोनाला कंटाळली असल्याचे स्टोरीमधून दिसत आहे.

तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असे लिहिले आहे की, ‘कोई वॅक्सीन निकाला दो भाई, वरना जवानी निकल जाएगी’ मलायकाने ही स्टोरी गमतीत लिहिली आहे. तरी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणे तिला कठीण जात असल्याचे यावरून दिसत आहे.

मलायका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिचे मेडिकल रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही लोक मलायकाचा मेडिकल रिपोर्ट फॉरवर्ड करून तिची खिल्ली उडवत होते. हे पाहून मलायकाची बहीण अमृता अरोरा फार भडकली होती. मलायकाचा कोरोना रिपोर्ट लीक झालाच कसा? असा प्रश्न बहीण अृमता अरोराने उपस्थित केला होता. तसेच डॉक्टर आणि पेशंट यामधील गोपनियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, असे अमृता म्हणाली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मलायका अरोराचा टीव्ही शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या सेटवर सात लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. यानंतर तातडीने या शोचं चित्रीकरण बंद करण्यात आले. मलायका आधीपासूनच या शोवर येण्यास घाबरत होती. पण तिची मनधरणी केल्यानंतर तिला परत शोमध्ये बोलावण्यात आले होते. यानंतर मलायकाला कोरोनाची लागण झाल्याचे कळाले. कोरोनाची कोणतीही लक्षण नसून तिने स्वतः सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवल्याचे सांगितले. तसेच ‘मी लवकरच यातून बरी होईन’, असे देखील ती म्हणाली होती.


हेही वाचा – कोरोनो मृतांच्या कुटुंबीयांना हिरा व्यापाऱ्यांचा मदतीचा हात