लॉकडाऊन असलं तरी बी टाऊनमध्ये रणबीर आणि आलियाच्या लग्नाचीच चर्चा रंगली आहे. हे दोघं पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन तयार केलेली शॉर्टफिल्म. लॉकडाऊनच्यावेळी आपल्या चाहत्यांना घरात सुरक्षित राहण्याचा संदेश देण्यासाठी ‘फॅमिली’ हा लघुपट तयार करण्यात आला. हा लघूपट सगळ्या कलाकारांनी आपल्या घरातच शूट केला. मात्र लघुपटाचे दिग्दर्शक प्रसून पांडे यांनी एका मुलाखतीत जो खुलासा केला त्यामुळे पुन्हा रणबीर आलियाच्या लग्नाची चर्चा रंगली.
लघुपटाचे दिग्दर्शक प्रसून पांडे एका मुलाखतीत म्हणाले की, रणबीर आणि आलियाचे शूट एकाच घरात करण्यात आलं आहे. रणबीर आणि आलियाने एकमेकांचे व्हीडिओ शूट केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा रणबीर आलियाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. कारण लॉकडाऊनमध्ये रणबीर आणि आलिया एकत्र रहात आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांचा बिल्डींगच्या खाली कुत्र्याला फिरवत असलेला एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. आणि आता प्रसून पांडे यांनी केलेलं वक्तव्य यामुळे या दोघांच्या लग्नाची पुन्हा चर्चा रंगली आहे.
T 3493 – When you see that the cause is greater than the idea you dreamt of .. there is just immense joy and gratitude for all my colleagues and friends in the making of this historic effort !
WE ARE ONE and WE SHALL OVERCOME ! Jai Hind ! https://t.co/WoquwkSyqT
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 6, 2020
या शॉर्ट फिल्ममध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, आलिया भट, चिरंजीवी, मोहनलाल, ममोट्टी, सोनाली कुलकर्णी, प्रोसंजित बुंबा, शिवा राजकुमार, दिलजीत दोसान या सर्वच भाषेतील कलाकारांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाने आपापल्या प्रातांत, शहरा आणि मुख्य म्हणजे घरामध्ये याचे शूटींग केले आहे. कोणीही घराबाहेर पडले नाही. अखेरीस, बिग बी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी घरातच बसा, घरा बाहेर पडू नका, कोरोनाला हरवा हा संदेशही दिला आहे. तसेच या शॉर्टच्या माध्यमातून जाहिरातीतून मिळणारी रक्कम सिने उद्योग जगतातील चतुर्थ श्रेणी वर्गाला दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
हे ही वाचा – सिनेकलाकारांचा फिल्म उद्योग जगतातील कर्मचारी, क्रू मेंमर्बंना मदतीचा हात