Corona Warriors : अभिनेत्री शिखा मल्होत्रा आढळली पॉझिटिव्ह

भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने पाहून कोरोना वॉरिअर बनलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा स्वतःच कोरोनाबाधित झाली आहे. शिखा मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून ही माहिती तिने सोश मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शिखाने काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करण्यास सुरूवात केली होती. मात्र कोरोनाबाधितांची सेवा करताना शिखालाच कोरोनाची बाधा झाली आहे.

View this post on Instagram

*Tested Positive* #Admitted अभी oxygen की कमी महसूस हो रही है 🥺 पोस्ट उनके लिए जो कहते हैं कोरोना कुछ नहीं 😷 #serving #continuously from past 6 months with all of your best wishes and prayers 👩🏻‍⚕️🇮🇳 आप सभी की दुआएँ ने छ: महिने तक जंग के मैदान में सलामत रखा और मुझे पूरा भरोसा है की अब भी आप सब की दुआओं से ही मैं जल्द स्वस्थ हो जाऊँगी 💝 अभी तक कोई vaccine तैयार नहीं हुई है तो अपना व अपने प्रियजनों का ख़्याल रखें, मास्क पहनना, नियमित रूप से हाथ बार बार धोना, sanitiser का इस्तेमाल करना न भूले 🙏🏻 असीम प्रेम व सम्मान के लिए आभार 🙌🏻💫 जय हिंद 🇮🇳 #coronafighternurse #shikhamalhotra #versatile #actress #coronawarriorsindia

A post shared by Shikha Malhotra (@shikhamalhotraofficial) on

मार्च महिन्याच्या अखेरीस मुंबई ही भारतातील कोरोनाग्रस्तांची राजधानी बनली होती. मुंबईत सर्वात जास्त रुग्ण आढळले आले होते. अशातच मनपाच्या एखाद्या रुग्णालयात सेवा देणे म्हणजे धोका पत्करणे. पण हा धोका त्यावेळी शिखाने स्वीकारला. तिने नर्सचे काम करण्याचा निर्णय घेतला. शिखा बॉलिवूडमध्ये फारशी चमक दाखवू शकली नाही. मात्र तिच्या या निर्णयाने तिने चांगलीच दाद मिळवली. जोगेश्वरी येथील मनपाच्या रुग्णालयात व्हॉलेंटियर नर्स म्हणून शिखा काम करू लागली.

बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधी शिखाने दिल्लीत नर्सच्या ट्रेनिंगचा पुर्ण कोर्स केलेला आहे. दिल्लीच्या वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिने २०१४ साली नर्सिंगचा कोर्स केला होता. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी तिने काही काळ नर्स म्हणून देखील काम केले होते. शिखाची ड्युटी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात लावण्यात आली होती.

हेही वाचा –

महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होणार; जे. पी. नड्डांचं सूचक विधान