घरCORONA UPDATECoronaVirus - रंगोलीची पुन्हा टिवटिव, मुख्यमंत्र्यांवर भडकली म्हणाली...

CoronaVirus – रंगोलीची पुन्हा टिवटिव, मुख्यमंत्र्यांवर भडकली म्हणाली…

Subscribe

रंगोलीने मात्र ट्विट करत उद्धव ठाकरे यांना चांगलेच सुनावले आहे. त्याचबरोबर त्यांना एक सल्लाही दिला आहे.

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. पण तरीही महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. खासकरून मुंबईत कोरोनाच्या रूग्णसंख्येत दरोरोज १०० ने वाढ होत आहे. ठाकरे सरकारही महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र अभिनेत्री कंगना रनौत हिची बहीण रंगोली चंडेल हिनं मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र अभिनेत्री कंगना रनौतची बहीण रंगोली चंडेल हिनं मात्र उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

खरतर बॉलिवूडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे नेहमी कौतुक केलं आहे. कोणी ट्वीटरवरून उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत तर कोणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरघोस मदत केली आहे. पण रंगोलीने मात्र ट्विट करत उद्धव ठाकरे यांना चांगलेच सुनावले आहे. त्याचबरोबर त्यांना एक सल्लाही दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाली रंगोली…

‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून गोष्टी शिकण्याची गरज आहे’ असं ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोनाच्या संशयीत रुग्णांसाठी शहरातील हॉटेल्स ताब्यात घेऊन त्यात आयसोलेशन वार्ड तयार केले आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यातून काही तरी शिकावं असं रंगोलीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

मात्र रंगोलीच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांन रंगोलीला चांगलच फैलाव घेतलं आहे. पण असं ट्वीट करायची रंगोलीची ही काही पहिलीच वेळ नाहीये. या आधीही रंगोलीने वेगवेगळ्या विषयांवर    ट्वीट करत नेटकऱ्यांचा रोष ओढावून घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -