Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Breast Implant सर्जरीत मृत्यू जवळून पाहिला, अमेरिकन मॉडेलचा थरारक अनुभव

Breast Implant सर्जरीत मृत्यू जवळून पाहिला, अमेरिकन मॉडेलचा थरारक अनुभव

प्ले बॉय मॅगझीनच्या संस्थापकाची पत्नी ह्यू हेफनरचे सर्जरी दरम्यान शरीरातले अर्धे रक्त वाया गेले

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत अभिनेत्री सुंदर, दिसण्यासाठी सर्जरी एकमेव पर्याय निवडतात. परंतु ह्या सर्जरी करताना काही घडल्यास किंवा शरीरात काही बदल झाल्यास जीवावरही बेतू शकते. असाच अनुभव ‘प्ले बॉय’ मॅगझीनच्या संस्थापकाची पत्नी व हॉलीवूड अभिनेत्री क्रिसटल हेफनरला आला आहे. क्रिसटल हेफनर नुकतीच ‘ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी’ केली परंतु या सर्जरीनंतर तिने मृत्यू अधिक जवळून पाहिला आहे. याबद्दल क्रिसटलने सर्जरीनंतर स्तनांवर बॅडेज लावण्यात आलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सुंदर दिसण्यासाठी केलेली सर्जरी फक्त आपले अवास्तविक सौदर्य खुलवू शकतो असे तिने लिहिले आहे. क्रिसटलने ‘ब्रेस्ट इम्प्लांट’ सर्जरीनंतरचा अनुभव शेअर करत लिहिले की, मी १६ ऑक्टोबरला ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली परंतु ती यशस्वी झाली नाही. यामुळे माझ्या शरीरातील रक्त पातळी खालावत गेली. यावेळी मला तातडीने हॉस्पीटमध्ये भर्ती करण्यात आले परंतु माझ्या शरीरातील रक्ताची पातळी खालावत असल्याने माझ्या शरीराला रक्ताची अधिक गरज होती. शरीरातील आलेल्या अशक्तपणामुळे माझे जेवण देखील कमी झाले होते परंतु आता माझी तब्येत सुधारत आहे. नैसर्गिक गोष्टींवर विश्वास ठेवत मी आजारी पडल्यानंतर २०१६ मध्ये मी शरीरावर केलेल्या सर्व प्रत्यारोपणे सर्जरीने काढून टाकली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Crystal Hefner (@crystalhefner)

- Advertisement -

क्रिसटल पुढे सांगते, या गोष्टीतून आयुष्यात मला पहिल्यांदाच खूप मोठा धडा शिकायला मिळाला. जोपर्यंत आपण एखादी गोष्टीतून शिकत नाही तोपर्यंत ती गोष्ट शिकण्यासाठी जग आपल्याला संधी देत असतं. आपल्या समाजात महिलांबद्दल भयानक विश्व उभ केलं जात. चित्रपट सृष्टीचा विचार केल्यास ८४,९% चित्रपट हे पुरुषचं दिग्दर्शित करतात त्यामुळे यातील महिलांचे चित्रिकरण हे नेहमीच विभस्यक, भडक दाखवले जाते. त्याचप्रमाणे सोशल मिडिया, जाहिरातीमध्येही महिलांबद्दल वेगळेच विचलित करणारे रुप दाखवले जाते. अनैसर्गिक सौंदर्य नेहमीच खोटे असते. (आणि यातील मी एक होते. )

आपल्या संस्कृतीमध्ये सौदर्याला नेहमीचे अधिक महत्व दिले जाते. परंतु सौंदर्याच्याअशा मानसिकतेसोबत राहणे कठीण आहे. माहिलांचे सर्वाधिक लौंगिक शोषण केले जाते. यासारख्याच अत्यंत वाईट अनुभवाचा मी सामना केला आहे. 10 वर्षापूर्वी माझे समाजातील स्थान हे माझ्या सुंदर दिसण्यावरुन ठरवले जात होते. त्यावेळी मला खूप प्रोत्साहन देण्यात आले कारण मी सुंदर दिसत होते. आज मला याबद्ल लिहिणे आवश्य़क वाटते कारण, मी यासाठी योग्य का होती कारण मला स्वत:ला समजण्यासाठी माझ्या सुंदर शरीराशिवाय माझ्याकडे काही नव्हते. पुढच्या पिढीबद्दल मला खेद व्यक्त करावासा वाटतो कारण, सौंदर्य हे अनेक फिल्टर, मेकअप आणि पैसा खर्च करुन मिळू शकत नाही. तसेच महिलांनाही बाह्य सौंदर्यासाठी मेकअप आणि इतर गोष्टींचा वापर करणे थांबवले पाहिजे. आता मी सध्या वयाच ३० वर्ष गाठलं पण आयुष्यातील खूप मोठा धडा मी यातून शिकले.


- Advertisement -

 

- Advertisement -