‘स्वागत तो करो हमारा…’; ‘दबंग ३’ टीझर!

Mumbai

बॉलीवूडमध्ये दबंग कलाकार म्हणून ओळख बनवलेल्या सुपरस्टार सलमान खान याच्या सीरिजमधील दबंग ३ चित्रपटाचा पहिला वहिला व्हिडिओ प्रोमो आज, बुधवारी सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. स्वतः सलमान खान याने त्याच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हिंदीसह त्याने इतर तीन भाषांमधील चित्रपटांचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

ठीक १०० दिवसानंतर…

गेली कित्येक दिवस दबंग ३ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अखेर या चित्रपटाचा टीझर आज सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हिंदिसोबतच कन्नड, तेलुगू आणि तमिळमध्येही हा चित्रपट येणार आहे. त्याचाही टीझर सलमान खानने शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता, नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा यांनी केले आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून ‘आ रहे है’, अशी टॅग लाईन सलमानने दिली आहे. तसेच आजपासून ठीक १०० दिवसानंतर… स्वागत तो करो हमारा, असेही त्याने नमूद केले आहे. त्यामुळे सलमान खान आणि दबंग सीरिजच्या चाहत्यांना आता १०० दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा –

मराठी मनावर अधिराज्य गाजवायला आलंय; ‘शिवराज्याभिषेक गीत’!