आर्चीचं हळूवार फुलत जाणारे प्रेम -कागर

Mumbai
kagar
कागर

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे कागरची या चित्रपटाची. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटातील राणी आणि युवराजची जोरदार चर्चा आहे. सगळ्यांची लाडकी आर्ची एका वेगळ्या भुमिकेत दिसणार आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. तर शुभंकर तावडे या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे.

kagar

चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं आणि चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर एका पाठोपाठ एक आलेल्या टीढरला आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरश:  डोक्यावर घेतलं. नुकतेच कागर चित्रपटातील “दरवळ मव्हाचा” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ज्यामध्ये युवराज आणि राणीचे हळूवार फुलत जाणारे प्रेम बघायला मिळत आहे. या आधी आलेल्या लागलीया गोडी तुझी आणि नागिन डान्स या गाण्यांनाही रिंकूच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 चित्रपटातील गाण्यांप्रमाणेच चित्रपटातील दिलखेचक संवादांनी प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहेत. हे संवाद प्रेक्षकांच्या तोंडात चित्रपट प्रदर्शित होण्या आगोदरच घोळू लागले आहेत. वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज – उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

Candid #rinkurajguru #kaagar

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on