घरमनोरंजनदुबईत रंगणाऱ्या 'गल्फ सिने फेस्ट'ची तारिख पुढे ढकलली

दुबईत रंगणाऱ्या ‘गल्फ सिने फेस्ट’ची तारिख पुढे ढकलली

Subscribe

कोरोनाबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भातील नियमावलीमुळे २० ते २३ जानेवारी दरम्यान दुबईत रंगणाऱ्या या नियोजित सोहळ्याचे आयोजन शक्य नाही.

मराठी सिनेमा सात समुद्रापार येण्यासाठी दुबईत रंगणारा गल्फ सिने फेस्ट २०२१ जानेवारी २० ते २३ दरम्यान दुबईत रंगणार होता. मात्र कोरोनाबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भातील नियमावलीमुळे २० ते २३ जानेवारी दरम्यान दुबईत रंगणाऱ्या या नियोजित सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने पुढील तारखांची जुळवाजुळव सध्या सुरु असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. आता हा सोहळा कधी होईल याबाबत लकरच सांगण्यात येईल असेही ते म्हणाले. कोरोना काळात मनोरंजनाची व्यासपीठे बदलत असताना नवी ऊर्मी देणारा हा गल्फ फेस्टिव्हल आहे. आखाती देशातील चित्रपटप्रेमींना आनंद देण्यासाठी तसेच मराठी चित्रपटसृष्टी नव्या ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने सज्ज व्हावी या उद्देश्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गल्फ सिने फेस्ट २०२१चे एक छोटेसे गेट टुगेदर पार पडले. सोहळ्याचे आयोजक असलेल्या ‘५ जी इंटरनॅशनल’ने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एका छोटेखानी समारंभाचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठारेही उपस्थित होते. मराठी सिनेमाला ग्लोबली कनेक्ट करण्याच्या अयोजकांच्या प्रयत्नाला दाद देत त्यांचे कौतुक केले. ५ जी इंटरनॅशलच्या वतीने हा प्रिमियर शो रंगणार आहे. या गल्फ सिने फेस्टमध्ये मराठीतील निवडक बहुचर्चित आगामी सिनेमांचे प्रीमियर दाखवले जाणार आहेत.

- Advertisement -

गल्फ सीने फेस्टमध्ये मराठी सिनेमांच्या ट्रेलर्स, प्रोमोज आणि गाण्यांची झलक दाखवण्यात येणार आहे. सातासमुद्रापार पडणाऱ्या या माराठी सिनेमांच्या सोहळा कमालीचा उत्साहवर्धक असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या एका छोट्या कार्यक्रमाला मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ तसेच विविध वाहिन्यांचे पत्रकार, मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत विविध कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.


हेही वाचा – विरूष्काच्या बाळाचा पहिला फोटो पाहिलात का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -