राखीच्या निर्णयानंतर दीपकने दाबला आईचा गळा

ड्रामाक्विन राखी सावंत ने लग्नाला नकार दिल्यानंतर दीपक वेडा झाला आहे. राखीने आपली दीड कोटींची अंगठी परत करावी नाही तर मी माझ्या आईचा गळा दाबेल असे तो म्हणाला आहे.

Mumbai
dipak
दीपक कलाल आपल्या आईचा गळा दाबताना (सौजन्य-इन्स्टाग्राम)

ड्रामाक्विन राखी सांवतने दीपक कलाल याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्या नंतर आता दीपकची प्रतिक्रिया आली आहे. राखीने हे सर्व मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी केले आहे. तसेच राखीने त्याची दीड कोटींची अंगठी परत मागितली आहे. मागील काही दिवसांपासून राखी आणि दीपकचे लग्न होणार अशा बातम्या येत होत्या. मात्र आपण दीपकशी लग्न करणार नसल्याचा व्हिडिओ राखीने  इन्स्टाग्रामवर टाकले होते. यानंतर दीपकला ब्लॉक ही करण्यात आले. राखीने नुकताच दीपकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दीपक त्याच्या आईचा गळा दाबताना दिसतो आहे. आता राखीचे हे लग्न एक फूल प्रूफ ड्रामा झाल्याचे दिसून येते आहे. राखीने ही पैसे घेतल्याचे कबूल केले आहे.

 

View this post on Instagram

 

#deepakklall

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

काय आहे प्रकरण

बॉलिवूडमध्ये लग्नाची लाट उसळल्यानंतर आयटम गर्ल राखी सावंत चे लग्न ठरले असल्याची माहिती समोर आली होती. राखी सावंतने ही माहिती आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर टाकली होती. याच बरोबर पत्रकार परिषद घेऊन तिने दिपक कलाल याच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच आपण दीपकशी लग्न करणार नसल्याचा तिने सांगितले आहे. राखीच्या ड्राम्याबद्दल माहिती असलेल्या फॅन्सचा अंदाज शेवटी खरा ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here