घरमनोरंजनNCB च्या प्रश्नांच्या भडीमारानंतर दीपिका ढसाढसा रडली

NCB च्या प्रश्नांच्या भडीमारानंतर दीपिका ढसाढसा रडली

Subscribe

शनिवार बॉलिवूडच्या तीन अभिनेत्रींसाठी कठीण दिवस होता. एकीकडे एनसीबीने दीपिका, सारा, श्रद्धाची जखून चौकशी केली तर दुसरीकडे दीपिका, सारा आणि रकुल या तिघींचे मोबाईलही जप्त केले. दरम्यान आता आणखी एका गोष्टींचा खुलासा झाला आहे. माहितीनुसार, चौकशी दरम्यान दीपिका पादुकोण तीन वेळा ढसाढसा रडली. तिच्या डोळ्यातले अश्रू अनावर झाले होते.

एनसीबीच्या अधिकाऱ्याने दीपिकासमोर जोडले हात

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा एनसीबी दीपिकाची चौकशी करत होत, तेव्हा दीपिका तीन वेळा ब्रेकडाऊन झाली आणि ती ढसाढसा रडू लागली. मग हे पाहून एनसीबी अधिकाऱ्याने दीपिकाला इमोशनल कार्ड न खेळण्याचा सल्ला दिला होता. पण तिच्या रडण्यामुळे एनसीबी अधिकाऱ्याने शेवटी हात जोडून रडण्याऐवजी सत्य सांगण्यास सांगितले. जर सर्व काही सत्य सांगितले तर तिच्यासाठी ते खूप चांगले असेल, असे दीपिकाला सांगण्यात आले होते.

- Advertisement -

चौकशी दरम्यान एनसीबीने दीपिका पादुकोणचा मोबाईल जप्त केला आहे. त्यामुळे सध्या एनसीबीची चौकशी त्याचे दिशेने होणार आहे. माहितीनुसार फोन तपासून तिचा कुठल्याही ड्रग्ज पॅडलरशी संबंध आहे की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण चौकशी दरम्यान दीपिकाने ड्रग्ज घेत नसल्याचे कबुली दिली आहे. तसेच ड्रग्ज सप्लाईबाबतचे आरोप देखील तिने फेटाळले आहेत. अशा परिस्थितीत आता तिच्या मोबाईलमधून काही सुगावा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच आधारावर दीपिकाविरुद्ध काय कारवाई केली जावी, हे देखील निश्चित केले जाईल.


हेही वाचा – ‘वजन कमी करण्यासाठी अभिनेत्री घेतात ड्रग्ज’, राखीने केले धक्कादायक खुलासे!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -