घरमनोरंजनरणवीरसाठी दीपिका ठरली 'लकी चार्म'

रणवीरसाठी दीपिका ठरली ‘लकी चार्म’

Subscribe

दीपिका आणि रणवीर यांच्या जोडीला आजवर प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. दीप-वीरच्या जोडीने आतापर्यंत तीन चित्रपट एकत्र केले आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचं बहुचर्चित लग्न आणि त्यांच्यातील गोड केमिस्ट्री सर्वांनाच परिचयाची आहे. दरम्यान, ‘दीपिकाशी लग्न करणं हे माझ्यासाठी लकी ठरल्याचं’ रणवीरने नुकतंच एका कार्यक्रमात म्हटलं आहे. ‘दीपवीर’ याचं इटलीमध्ये झालेलं शाही लग्न संपूर्ण जगात हिट ठरलं. दीपिका आणि रणवीरचं लग्न जितकं गाजलं तितकंच काही कारणांमुळे ते वादातही सापडलं. एकीकडे त्यांच्या लग्नातील फोटोंवर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव झाला तर, दुसरीकडे लग्नातील काही विधींवर आक्षेपही घेण्यात आला. रणवीर-दीपिकाला त्यांच्या लग्नावरुन ट्रोल देखील करण्यात आलं. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमवीर आता रणवीर सिंगने दीपिकाशी लग्न ‘लकी’ ठरल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. रणवीर एका खासगी कार्यक्रमामध्ये म्हणाला की, ‘आमच्या लग्नानंतर रिलीज झालेल्या सिम्बा या माझ्या चित्रपटाने १०० करोडहून अधिक कमाई केली. लग्नानंतरचा हा माझा पहिला सोलो चित्रपट होता ज्याने इतकं यश संपादन केलं. त्यामुळे मी छातीठोकपणे असं म्हणू शकतो की दीपिकाचं लग्न करुन माझ्या आयुष्यात येणं हे माझ्यासाठी खरंच लकी आहे’.


वाचा : अमृता सुभाष बनली रणवीर सिंगची ‘आई’

दीपिका ‘लक्ष्मी’चं रूप

रणवीर सिंग यावेळी म्हणाला की, ‘एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. दीपिका माझ्या आयुष्यातली ती स्त्री आहे. मला किंवा सिंबाला मिळालेलं यश हे दीपिकामुळे असं मी मानतो. भारतीय मान्यतेनुसार, स्त्रीला लक्ष्मीचे रुप मानले जाते. लक्ष्मीमुळे घराची घरातील लोकांची भरभराट होते. दीपिका आमच्या घरची लक्ष्मी आहे. दीपिकामुळेच मी यशाची चव चाखली आहे.’ दीपिका आणि रणवीर यांच्या जोडीला आजवर प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. दीप-वीरच्या जोडीने आतापर्यंत तीन चित्रपट एकत्र केले आहे. त्यापैकी ‘पद्मावत’ चित्रपटात जरी हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध असले, तरी ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘राम-लीला’ या चित्रपटांमध्ये त्यांच्यातील केमिस्ट्री हिट ठरली आहे. मात्र, २०१९ या वर्षात दीपिका-रणवीर एकत्र काम करणार नसल्याचं रणवीरने जाहीर केल्यामुळे, चाहत्यांची नाराजी झाली असणार यात शंका नाही. 

दरम्यान, रणवीर सिंगचा ‘गली बॉय’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्टही प्रमुख भूमिकेत आहे. तर दुसरीकडे सध्या रंगत असलेल्या चर्चांनुसार दीपिका पदुकोण दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्यासोबत ‘छपाक’ चित्रपट करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -