घरमनोरंजनरणवीरच्या 'या' लुकसाठी दीपिकाचा बिग 'नो'

रणवीरच्या ‘या’ लुकसाठी दीपिकाचा बिग ‘नो’

Subscribe

रणवीरचा लहानपणीचा लुक त्याची तथाकथित प्रेयसी दीपिकाला आवडला नाही. काय दिली आहे दीपिकानं यावर आपली प्रतिक्रिया?

रणवीर सिंगची बॉलीवूडमध्ये स्वतःची अशी एक ओळख आहे. एक उत्तम अभिनेता तर तो आहेच पण आपल्या विचित्र स्टाईलसाठी आणि मस्तीसाठीदेखील रणवीर प्रसिद्ध आहे. आताच नाही तर रणवीर लहानपणापासूनच असा असल्याचं त्याच्या इन्स्टावरील पोस्टनं सिद्ध झालं आहे. पण हा लुक त्याची तथाकथित प्रेयसी दीपिकाला मात्र अजिबात आवडला नाही.

रणवीरनं इन्स्टावर केला फोटो पोस्ट

आताच नाही तर रणवीर लहानपणापासूनच स्टाईल आयकॉन आहे. इन्स्टावर रणवीरनं त्याच्या लहानपणीचा एक वेगळ्या हेअरस्टाईलचा फोटो पोस्ट केला आहे. ‘अॅव्हट ग्रेड सिन्स 1985’ असं कॅप्शन त्यानं या फोटोला दिलं. हा फोटो पोस्ट केल्यानंतर रणवीरच्या चाहत्यांनी साहजिकच त्यावर चांगल्या कमेंट्स द्यायला सुरुवात केली. मात्र रणवीरची तथाकथित प्रेयसी दीपिकाला मात्र हा फोटो आवडला नाही हे तिच्या कमेंटवरून वाटत आहे. ‘नो’ अशी कमेंट या फोटोवर तिनं दिली आहे.

- Advertisement -

रणवीरची स्टाईल

रणवीरला प्रेक्षकांनी आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलं असून त्याची स्टाईल नेहमीच त्यांना भावली आहे. पद्मावत, बेफीक्रे, बाजीराव मस्तानी, लीला इत्यादी चित्रपटांमध्ये केलेली प्रत्येक स्टाईल ही त्याला साजेशीच होती. केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातदेखील रणवीर जे कपडे घालतो ते अतिशय वेगळे असतात पण तो त्याला योग्य प्रकारे न्याय देतो. कपडे कितीही विचित्र असले तरीही रणवीर मात्र त्यामध्ये स्टायलिशच दिसतो. सध्या रणवीर ‘सिम्बा’ चित्रपटाच्या चित्रीकराणात व्यस्त असून लवकरच त्याचा ‘गल्ली बॉय’ प्रदर्शित होणार आहे. तर सध्या रणवीर आणि दीपिका १० नोव्हेंबरला लग्न करणार असल्याचीदेखील चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -