छपाकच्या प्रमोशनसाठी दीपिका पोहचली ‘या’ मराठी कार्यक्रमाच्या मंचावर

Mumbai

सध्या दीपिका पदुकोण छपाकच्या प्रमोशनच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांना भेट देत आहे. नुकताच एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावली. छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका मी होणार सुपरस्टारच्या सेटवर आली होती.
दीपिकाचं सेटवर आगमन होताच सगळा माहोलच बदलून गेला. स्पर्धकांची गाणी ऐकत, त्यांचा उत्साह वाढवत दीपिकाने या मंचावर धमाल उडवून दिली. इतकंच नाही तर या अनोख्या संगीत मैफलीत दीपिका स्वत:ही सामील झाली. धमाकेदार गाणी सादर करत दीपिकाने या मैफलीत अनोखे रंग भरले. दीपिकासाठी आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे यांनी देखिल खास गाणी सादर केली, आणि या गाण्यांना दीपिका आणि प्रेक्षकवर्गाकडून दिलखुलास वन्समोअर मिळाला.

 


‘टॅलेण्ट ही अशी गोष्ट आहे ज्याचा कधीही विसर पडत नाही. काही जणांना मात्र आर्थिक परिस्थितीमुळे, घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे आणि अश्या बऱ्याच कारणांमुळे आपलं स्वप्न पूर्ण करता येत नाही. स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम अश्याच स्पर्धकांना दुसरी संधी देत आहे ज्यांचं गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. संगीत क्षेत्रातले दिग्गज हा कार्यक्रम जज करणार आहेत त्यामुळे स्पर्धकांचं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरणार आहे. आयुष्यात कधीना कधी दुसरी संधी ही मिळतेच. गाण्याचं स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या स्पर्धकांसाठी ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम हीच संधी घेऊन आला आहे.’
– सतीश राजवाडे, निर्माते

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here