दीपवीरच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस, पहा काय म्हणाला रणवीर?

दीपवीरच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस, पहा काय म्हणाला रणीवर?

बॉलिवुडची हॉट आणि स्वीट जोडी म्हणजे दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह. दीपवीरची ही सेलिब्रिटी जोडी प्रत्येक वेळी काही ना काही कारणांवरून सोशल मीडियावर चर्चेत असतात. आज दीपिका आणि रणवीर चर्चेत आहेत त्याचे कारणही काही खास आहे. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. त्यामुळे दीपिका आणि रणवीरही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिपवीरच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त दीपिका सोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दीपिका आणि रणवीर ही जोडी रोमँटिक अंदाजात दिसत आहे.दोघांचे फोटो शेअर करत रणवीर अत्यंत रोमँटिक कॅप्शन लिहिले आहेत. ‘आपण दोघे एकमेकांसोबत कायमचे जोडले गेलो आहोत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’ तसेच रणवीरने दीपिकाला ‘मेरी गुडीया’ असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दीपवीरच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रणवीर पोस्ट केलेल्या फोटोंवर तब्बल १६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दीपिकाने रणवीरला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांचाही फोटो दीपिकाने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. रणवीर तू माला खऱ्या अर्थाने पूर्ण करतोय असे म्हणत दीपिकाने दोघांचा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

१४ नोव्हेंबर २०१८ रोजी दीपिका आणि रणवीर यांची लग्नगाठ बांधली गेली. इटलीमध्ये शाही थाटात दीपवीरचा विवाह सोहळा पार पाडला होता. त्यांच्या शाही लग्नाचे फोटोहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. रामलीला या सिनेमादरम्यान दीपिका आणि रणवीर रिलेशनशन मध्ये आले होते. रणवीर दीपिका हे पुन्हा एकदा ऑन स्क्रिन दिसणार आहेत. रणवीर आणि दीपिकाचा ८३ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – अभिनेता आसिफ बसरा यांची ‘जब वी मेट ते ‘होस्टेजेस’ पर्यतची कारकिर्द