घरमनोरंजनदीपिका-रणवीर मुंबईत परतले; विमानतळावर चाहत्यांची गर्दी

दीपिका-रणवीर मुंबईत परतले; विमानतळावर चाहत्यांची गर्दी

Subscribe

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग इटलीमध्ये लग्न करुन नुकतेच मुंबईत परतले आहेत. दीपवीरच्या स्वागतासाठी त्यांच्या चाहत्यांनी मुंबई विमानतळावर चांगलीच गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. मुंबई विमानतळावरून दोघेही रणवीरच्या खार येथील निवासस्थानी पोहोचले असून आज दीपिकाचा गृहप्रवेश होणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी बंगळुरुमध्ये तर २८ नोव्हेंबर रोजी मुंबईत दीपवीरतर्फे ग्रँड रिसेप्शन दिले जाणार आहे. या रिसेप्शनला बॉलिवूड आणि इतर क्षेत्रातील मित्रपरिवार हजेरी लावणार आहे.

१४ आणि १५ नोव्हेंबर रोजी दीपिका-रणवीर लग्न बंधनात अडकले. पहिल्या दिवशी दीपिकाच्या माहेरच्या म्हणजेच कोंकणी पद्धतीने तर दुसऱ्या दिवशी दीपिकाच्या सासरच्या म्हणजेच सिंधी पद्धतीने विवाह संपन्न झाला होता.

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -