घरट्रेंडिंगसुशांतच्या मृत्यूसंबंधीत बातम्यांवर दीपिका मीडियावर भडकली; म्हणाली, फरक ओळख

सुशांतच्या मृत्यूसंबंधीत बातम्यांवर दीपिका मीडियावर भडकली; म्हणाली, फरक ओळख

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज, रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या निधनाची बातमी येतात सिनेसृष्टीसह देशभरातून दुःख व्यक्त करण्यात आले. अशावेळी प्रसार माध्यमांनी दिलेल्या निधनाच्या वृत्तांकन तसेच वार्तांकनावर अभिनेत्री दीपिका पदुकोण मात्र नाराज झाल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतने वयाच्या ३४ व्या वर्षी आत्महत्या केली असून त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र माध्यमांमध्ये commited suicide अशा आशयाच्या बातम्या येत असल्याचे दीपिका मीडियावर संतापली आहे.

काय म्हणाली दीपिका 

दीपिकाने मीडियातील प्रतिनिधींना उद्देशून म्हटले आहे की, जे गुन्हेगार असतात ते गुन्हा commit करतात. माणसं suicide commit करत नाहीत. आत्महत्येमुळे त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकांच्या आत्महत्येला commit असा उल्लेख करू नका. त्यात फरक आहे. अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवले आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आले नाही. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली.

- Advertisement -

हेही वाचा –

सुशांतच्या आलिशान घराचे भाडे होते ४.५१ लाख रुपये; सहा महिन्यांपूर्वीच आला होता राहायला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -