म्हणून दीपिकाने बदलले स्वत:चे नाव

Mumbai
deepika padukone changed her social media twitter name to malti
म्हणून दीपिकाने बदलले स्वत:चे नाव

सध्या गेल्या काही दिवसात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चर्चेत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी दीपिकाने जेएनयू गाठले होते. यानंतर दीपिकावर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव तर टीकेची झोड उठली जात होती. यादरम्यान तिचा ‘छपाक’ चित्रपट हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. जेएनयूच्या निषेधात सहभागी झाल्यामुळे भाजप नेते आणि समर्थकांनी तिला ट्रोल करण्यास सुरू केली होती. त्यामुळे दीपिका या काळात चांगलीच चर्चेत आली होती. नुकतच तिने सोशल मीडियावरील नाव बदलले आहे. तिने तिच्या पती म्हणजेच रणवीर सिंगच्या नावाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच नाव लावले आहे.

आता दीपिकाच्या ट्विटर अकाऊंटचे नाव दीपिका पदुकोण नसून ‘मालती’ असे ठेवले आहे. ‘मालती’ हे नाव दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचे नसून दीपिकाचे आहे. ‘छपाक’ या चित्रपटात दीपिकाने ‘मालती’ची व्यक्तिरेखा साकारली आहे. बऱ्याच वेळा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरील नाव बदलले आहे. यापूर्वी अभिनेता वरुण धवनने देखील त्याने साकारत असलेल्या भूमिकेचे नाव ठेवले होते.

‘छपाक’ चित्रपटाचे कथानक अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिकाने लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त दीपिकासोबत विक्रांत मेसी प्रमुख भूमिकेत आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये ‘छपाक’ने १८.६७ कोटींची कमाई केली आहे.


हेही वाचा – साराने शेअर केला बालपणीचा फोटो, चाहत्यांनी आली ‘या’ स्टार किड्सची आठवण