Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Ohh! दीपिकाने फेसबुक, इंस्टा, ट्विटरवरून Delete केल्या सर्व पोस्ट!

Ohh! दीपिकाने फेसबुक, इंस्टा, ट्विटरवरून Delete केल्या सर्व पोस्ट!

दीपिकाने सर्व पोस्ट डीलिट का केल्यात, या संदर्भात दीपिका नेमकं कोणतं स्पष्टीकरण देईल का?

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची अभिनेत्री मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण हिनं बॉलिवूडविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या अभिनयशैलीने तिने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं. मात्र दीपिकाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंट्सला झालं तरी काय? नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी दीपिकाच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरील सर्व पोस्ट गायब झाल्याचे बघायला मिळतंय. दीपिकाने या सर्व पोस्ट स्वतः डिलीट केल्या की सोशल मीडियावरील तिचे सर्वच अकाऊंट हॅक झाले आहे, हे मात्र अद्याप कळू शकलं नाही.

- Advertisement -

दीपिकाचे इन्स्टाग्रामवर ५२ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर ट्विटर आणि फेसबुकवरदेखील सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरही बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या चाहत्यांनी तिच्या New Year सेलिब्रेशचे फोटोंची उत्सुकता असताना तिनं मात्र वेगळंच पाऊल उचललं. दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विचरवरील सर्व पोस्ट डिलीट केल्याने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे कंमेट्सवरून बघायला मिळाले. तिनं असं नेमकं का केलं असावं हाच प्रश्न चाहत्यांना सध्या पडलाय.

- Advertisement -

आगामी चित्रपटासाठीचं प्रसिद्धी तंत्र म्हणून तिनं असं केलं असावं, किंवा यामागं आणखीही कारणं असू शकतात अशी शक्यताही चाहत्यांकडून वर्तवली जात आहे. आता यामागील नेमकं कारण समोर आलं नसल्याने दीपिकाने सर्व पोस्ट डीलिट का केल्यात, या संदर्भात दीपिका नेमकं कोणतं स्पष्टीकरण देईल, याकडे साऱ्यांचे लक्ष सध्या लागले आहे.

दरम्यान, नव्या वर्षाच्या स्वगातासाठीच्या तिच्या राजस्थान दौऱ्यामुळं अभिनेत्री दीपिका चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबाबत सांगावं तर, ती पती रणवीर सिंह याच्यासह ‘`83’ या चित्रपटातून स्क्रीन शेअर करणार आहे.

- Advertisement -