घरमनोरंजनदीप-रणवीर लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार नाही?

दीप-रणवीर लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार नाही?

Subscribe

१४ नोव्हेंबर २०१८ ला अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच इटलीमध्ये लग्न झाले. या दोघांच्या लग्नानंतर दीपिका आणि रणवीरचे भारतात रिसेप्शनही झाले या गोष्टीला आता लवकर १ वर्ष पुर्ण होत आहे.१४ तारखेला दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. पण या वर्षी दीपिका आपला वाढदिवस साजरा करणार नाहीये. कारण सध्या दीपिकाची तब्येत ठिक नाहीये. दीपिकाने इन्स्टाग्रामवर फोटो टाकत आपण आजारी असल्याची माहिती दिली आहे.

 

- Advertisement -

नुकतेच दीपिकाने आपली मैत्रीण उर्वशी केशवानीच्या लग्नाला हजेरी लावलेली. या लग्नात दीपिका-रणवीरने खूप धम्माल केली. या लग्नाचे फोटोही दीपिकाने शेअर केले होते. पण लग्नावरून आल्यावर दीपिका आजारी पडली आहे.

- Advertisement -

दीपिकाने आजारी असलेला फोटो शेअर करत, ‘तुम्ही तुमच्या मैत्रणीच्या लग्नात जेव्हा धम्माल करता’ असे कॅप्शन लिहीले आहे. आता दीपिका आजारी असल्यामुळे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे खास सेलेब्रेशन होणं थोडं कठीणच आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -