Video : रणवीर सिंग लाईव्ह येताच दीपिका भडकली, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लाईव्ह येताच दीपिका भडकते आणि रणवीर निघून जातो.

Mumbai
deepika padukone scolds ranveer singh on live chat session with ayushmann khurrana
रणवीर सिंग आणि आयुष्यमान खुराना

कोरोना व्हायरसमुळे सध्या बॉलिवूड कलाकार आपआपल्या घरात बंद आहेत. पण, सोशल मीडियावर मात्र, बॉलिवूड कलाकार चांगलेच active झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कित्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग देखील काही मागे नाही. रणवीर आपल्या चाहत्यांचे मनोरंज करण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ करत असतो. त्यातच सध्या रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर आणि आयुष्यमान खुराना लाईव्हमध्ये गप्पा मारताना दिसत आहेत. मात्र, रणवीर फार काळ लाईव्ह राहत नाही, कारण पाठून दीपिका रणवीरवर भडकते आणि रणवीर निघून जातो.

आणि रणवीर तात्काळ लाईव्ह मधून निघून जातो

या व्हिडीओमध्ये आयुष्यमान खुराना रणवीरला लाईव्ह पाहून खूप खुश होतो. तो म्हणतो, ‘थँक गॉड तू कपडे घातले आहे’. त्यावर रणवीर म्हणतो ‘मी आताच उठलो आहे आणि लाईव्ह आलो’. तेवढ्यातच रणवीर बाय बाय असे बोलतो. त्यावर आयुष्यमान म्हणतो बाय बाय. कोणाला बोलत आहेस. त्यावर रणवीर म्हणतो तुलाच बोलत आहे. दीपिका ओरडत आहे. म्हणते ओरडू नकोस मी झूम कॉल करत आहे’, असे म्हणून रणवीर निघून जातो.

त्यानंतर आयुष्मान खुराना म्हणतो ‘वहिनी ओरडली त्यामुळे रणवीर निघून गेला’.


हेही वाचा – Video: जान्हवी कपूरचा कथ्थक डान्स सोशल मीडियावर व्हायरल