Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पोस्ट गायब झाल्यानंतर दीपिकाची चाहत्यांना गुड न्यूज!

पोस्ट गायब झाल्यानंतर दीपिकाची चाहत्यांना गुड न्यूज!

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांना निराश करण्याचे काम केले आहे. दीपिकाने एका झटक्यात इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. दीपिकाने जेव्हा असे केले तेव्हा सर्व चाहते हैराण झाले. जो सेलिब्रिटी सोशल मीडियावर इतका सक्रिय असतो, ज्याचे कोटीहून अधिक चाहते असतात, त्याचे अचानक सोशल मीडियावर पोस्ट डिलीट होणे हे विचाराच्या बाहेर आहे. पण आता दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. दीपिका पादुकोण पुन्हा सोशल मीडियावर Active झाली आहे. तिने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटवर नव्या वर्षाच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली आहे.

दीपिकाने व्हिडिओच्या जमान्यात आपल्या आवाजातील ऑडिओच्या माध्यमातून चाहत्यांसाठी मेसेज दिला आहे. तिने सोशल मीडियावर ३० सेकंदाचा ऑडिओ शेअर केला आहे. ऑडिओमध्ये दीपिकाने सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती ऑडिओमध्ये म्हणते आहे की, ‘तुमचे माझ्या ऑडिओ डायरीमध्ये स्वागत आहे. या माध्यमातून मी माझा विचार मांडेन. २०२० वर्ष अनिश्चिततेने भरलेले होते. पण माझ्यासाठी हे वर्ष खूप काही शिकायला मिळल्यासारखे होते. माझ्यासाठी २०२० हे कृतज्ञतेचे वर्ष देखील होते. आता २०२१ साठी मी एवढेच सांगू शकते की, तुम्ही सर्व निरोगी रहा आणि तुमच्या मनाला शांती मिळेल. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा.’

- Advertisement -

सध्या तिचा हा ऑडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दीपिका ऑडिओ सीरिज सुरू करू शकते, असे म्हटले जात आहे. काही चाहते दीपिकाने चर्चेत राहण्यासाठी हा पीआर स्टंट केला असल्याचे म्हटले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Viral Video: वर्षा अखेरीस नोरा फतेहीचा Killer Dance


 

- Advertisement -