घरट्रेंडिंग'या' टिक-टॉक व्हिडिओमुळे दीपिका झाली पुन्हा ट्रोल

‘या’ टिक-टॉक व्हिडिओमुळे दीपिका झाली पुन्हा ट्रोल

Subscribe

गेल्या काही दिवसात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चर्चेत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी दीपिकाने जेएनयू गाठले होते. यानंतर दीपिकावर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव तर टीकेची झोड उठली जात होती. यादरम्यान तिचा ‘छपाक’ चित्रपट हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. जेएनयूच्या निषेधात सहभागी झाल्यामुळे भाजप नेते आणि समर्थकांनी तिला ट्रोल करण्यास सुरू केली होत. तसंच ‘छपाक’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची देखील भाषा केली होती. मात्र आता पुन्हा दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. तिच्या एका टिक-टॉक व्हिडिओमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ दीपिकाने टिक-टॉक स्टार फाबीसोबत तयार केला आहे. या व्हिडिओत दीपिका ‘छपाक’चं प्रमोशन करताना दिसत आहे. दीपिकाला टिक-टॉक स्टार फाबी तीन आवडत्या चित्रपटातील लूक्स विचारते आणि त्यानंतर ती ते लूक्स रिक्रिएट करते. ‘ओम शांती ओम या चित्रपटातील शांती, ‘पीकू’ मधील पीकू आणि ‘छपाक’ मधील मालती हे लूक करण्याचे दीपिका फाबीला चॅलेंज देते. त्यानंतर फाबीने हे चॅलेज स्वीकारले आणि ते पूर्ण केले. पण ज्यापद्धतीने हा व्हिडिओ केला आहे. त्यावर नेटकऱ्यांची नाराजी व्यक्ती केली आहे.

- Advertisement -

तसंच अनेकांनी हा व्हिडिओ अत्यंत निंदणीय असल्याचं देखील म्हटलं आहे. याशिवाय दीपिकाने हे चॅलेंज द्यायला नको होत, हा पब्लिसिटी स्टंट खूप वाईट असल्याचा देखील प्रतिक्रिया दिल्या आहे. दीपिका एका अॅसिड हल्ल्यातील पीडितेवर चॅलेज कसं देऊ शकते? असा देखील सवाल उपस्थित केला आहे. कुठलाही लूक हा अॅसिड हल्ल्यात शरीरावर झालेले व्रण असू शकतं नाही असं देखील म्हटलं आहे. दीपिका तुला लाज वाटली पाहिजे, आतापर्यंतचे तुझं हे खराब प्रमोशन म्हटलं आहे

पाहा काय म्हणाले नेटकरी?


हेही वाचा – शबाना आझमी यांच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -