घरमनोरंजनबॉलिवूड नाही तर हॉलिवूडच्या 'या' चित्रपटात झळकणार दीपिका

बॉलिवूड नाही तर हॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटात झळकणार दीपिका

Subscribe

दीपिका पदूकोण सध्या तिच्या लग्नाच्या घाईत असली तरी ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. दीपिका एक्सएक्सएक्स रिटर्न ऑफ जेंडर केज यानंतर हॉलिवूड स्टार विन डिजलने या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पण दीपिकाचे नाव निश्चित केलं आहे.

सध्या दीपिका पादुकोण चर्चेत असते ते तिच्या आणि अभिनेता रणवीर सिंगसोबत असणाऱ्या लग्नाच्या चर्चेमुळे. २०१८ च्या अखेरीस दीपिका आणि रणवीर लग्नबंधनात आडकणार आहे. त्यामुळेच ती सध्या कोणत्या चित्रपटातही दिसत नाहीये. दीपिकाने पद्मावतीनंतर कोणताच सिनेमाही साईन केला नाहीये. पण दीपिकाच्या चाहत्यांनाही नाराज होण्याची गरज नाही. कारण दीपिका लवकरच एका हॉलिवूडच्या चित्रपटात दिसणार आहे.

एक्सएक्सएक्स रिटर्न ऑफ जेंडर केज या चित्रपटातून दीपिकाने हॉलिवूड मध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील कामामुळे दीपिकाची सगळ्यांनीच स्तूती केली. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही पण दीपिकाचा हॉलिवूडमध्ये यशस्वीरीत्या पदापर्ण झालं. दीपिका एक्सएक्सएक्स रिटर्न ऑफ जेंडर केज यानंतर हॉलिवूड स्टार विन डिजलने या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पण दीपिकाचे नाव निश्चित केलं आहे. यापूर्वी अनेक शोमध्ये डीजेने या सीरीजच्या पुढच्या भागात दीपिकाला घेणार असल्याचं बोलून दाखवलं होतं.

- Advertisement -

डीजे यांनी चीनी सिंगर रॉय वैंग ‘एक्सएक्सएक्स रिटर्न ऑफ जेंडर केज’ च्या पुढील सीरिजमध्ये एका महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार आहेत. अशी एक पोस्ट टाकली होती. पण यानंतर एका चाहत्याने डीजेला दीपिका विषयी विचारले. दीपिका या चित्रपटात दिसणार का? या प्रश्नानंतर डीजेने होय असे उत्तर त्या चाहत्याला दिले. त्यामुळे एक्सएक्सएक्स रिटर्न ऑफ जेंडर केज दुसऱ्या भागात दीपिकाचं नाव निश्चित झालं आहे यावर शिक्कामोर्तब झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -