नंदीपूजा करून दीपिकाची लग्नविधीला सुरुवात

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे आता सगळ्यांनाच वेध लागले आहेत. दीपिकाच्या लग्नविधीला सुरुवात झाली असून तिच्या पहिल्या विधीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Mumbai
ranveer singh deepika padukone
Ranveer and Deepika

नोव्हेंबर महिना आला आहे आणि आता सर्वात मोठ्या लग्नाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. बॉलीवूडची सर्वात जास्त चर्चेत असणारी जोडी दीपिका आणि रणवीर या महिन्याच्या १४-१५ तारखेला विवाहबद्ध होत आहेत. दीपिकाने कामातून ब्रेक घेत कधीच लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. पण आता लग्नाच्या विधीलाही सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. दीपिकाने लग्नाआधी नंदीपूजा केली असून याचे फोटो व्हायरल होत आहेत. पारंपरिक कपड्यांतील दीपिका अतिशय सुंदर दिसत असून तिच्या चेहर्‍यावरचा आनंदही लपत नाहीये. शिवाय केशरी रंगाच्या या पारंपरिक कपड्यांमध्ये दीपिकाचा रंगही खुलून दिसत आहे.

नुकतीच झाली नंदीपूजा

दीपिकाच्या हेअर स्टायलिंग सदस्यांपैकी एक असणार्‍या शालीन नथनीने दीपिकाच्या नंदीपूजेचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या उज्ज्वल आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका आणि रणवीरचे लग्न इटलीतील लेक कोमो इथे होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अजूनही हा सोहळा नक्की कुठे होणार याची कोणालाही कल्पना नाही. असे असले तरीही दीपिका आणि रणवीरच्या लग्नामध्ये अगदी मोजक्या लोकांनाच निमंत्रण असल्याचे म्हटले जात आहे. हा विवाह सोहळा शाही स्वरुपाचाच असणार याची सर्वांनाच कल्पना आहे. मात्र इतक्या वर्षांच्या सहवासानंतर रणवीर आणि दीपिकाच्या या नव्या प्रवासाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवाय आता अगदी कमी दिवस राहिले असल्यामुळे दीपिका आणि रणवीरचे असेच लग्नांच्या विधीचे विविध फोटो समोर येतील यासाठी सध्या सोशल मीडियावरदेखील चर्चा आणि उत्सुकता लागून राहिलेली आहे. दरम्यान दीपिकाच्या व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये दीपिकाच्या चेहर्‍यावरील आनंद लपून राहिलेला नाही.

 

View this post on Instagram

 

#bridetobe #deepikapadukone #photooftheday #instalove #instalike #movies #smile #ranveersingh #mumbai #india

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on