घरमनोरंजनलग्नात दीपिकाच्या ओढणीवर होता 'हा' खास संदेश

लग्नात दीपिकाच्या ओढणीवर होता ‘हा’ खास संदेश

Subscribe

जगप्रसिद्ध फॅशन डिझाईनर 'सब्यसाची'च्या फॅशन ब्रॅण्डचे रॉयल कपडे या दोघांनी परिधान केले होते.

‘दीपवीर’ अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या फोटोंची लोक आतुरतेने पाहत होते. काल रात्री उशीरा दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो समोर आले आणि त्यांचे जगभरातील चाहते सुखावले. दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लग्नातील फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये नववधू आणि वराच्या जोड्यातील दीपवीरचा अंदाज खूपच सुंदर दिसतो आहे. कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी विवाह केला. दोन्ही पद्धतीच्या लग्नाचे एक-एक फोटो समोर आले असून सध्या ते सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. जगभरातील लोक या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इटलीतील लेक कोमो येथे १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी दीपवीरचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यापैकी १४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने विवाह पार पडला, ज्यामध्ये कपड्यांची थीम व्हाईट कलर होती. तर, १५ तारखेला सिंधी पद्धतीने लग्न करण्यात आले ज्यामध्ये लाल कलरची थीम होती. दीपिका आणि रणवीर दोन्ही पद्धतीच्या लग्नामध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. जगप्रसिद्ध फॅशन डिझाईनर ‘सब्यसाची’च्या फॅशन ब्रॅण्डचे रॉयल कपडे या दोघांनी परिधान केले होते. त्यातही दीपिकाने सिंधी पद्धतीच्या लग्नात घातलेल्या ओढणीमध्ये एक खास संदेश छापण्यात आला होता. सध्या सोशल मीडियावर याचीच जोरदार चर्चा आहे.

दीपिकाच्या ओढणीत खास काय?

१५ नोव्हेंबरला झालेल्या सिंधी पद्धतीच्या लग्नात रणवीरने कांजीवरम शेरवानी आणि लाल रंगाचा साफा घातला होता. तर दीपिकाने लाल रंगाचा सिग्नेचर लेहंगा परिधान घातला होता. या लेहंग्यावर घेतलेल्या ओढणीची सध्या सगळीकडे चर्ची सुरू आहे. दीपिकाच्या ओढणीवर ‘सदा सौभाग्यवती भव्’ असा पारंपारिक हिंदू आशीर्वाद छापण्यात आला होता. नवरदेवाच्या कुटुंबियांकडून वधूला हा लग्नाचा जोडा दिला जातो. या प्रथेनुसारच रणवीर सिंग भवनानीच्या कुटुंबियांकडून दीपिकाला हा लेहंगा आणि शुभाशिर्वाद असलेली ओढणी भेट देण्यात आली होती. या ओढणीमार्फत दीपिकाला संपूर्ण भवनानी कुटुंबियांनी उज्वल भविष्याचा शुभेच्छा दिल्या होत्या.

- Advertisement -

‘दीपवीर’च्या स्वागतासाठी मुंबई सज्ज

उपलब्ध माहितीनुसार, येत्या १ ते २ दिवसांत नवविवाहीत दीपिका आणि रणवीर मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील त्यांचं घर दिव्यांच्या रोषणाईने सजवण्यात आलं आहे. घरासोबतच आजूबाजूच्या परिसरातही दिव्यांची छान रोषणाई करण्यात आलीये. दीपवीर मुंबईत कधी येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. सोबतच २८ तारखेला मुंबईत होणाऱ्या त्यांच्या ग्रँड रिसेप्शनचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.

- Advertisement -

वाचा: दीपिका-रणवीरने गिफ्ट घेतलं नाही, कारण…

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -