घरट्रेंडिंगरिस्ट बँड, QR कोड; दीपिका-रणवीरच्या लग्नात सिक्युरिटी टाइट

रिस्ट बँड, QR कोड; दीपिका-रणवीरच्या लग्नात सिक्युरिटी टाइट

Subscribe

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा विवाहसोहळा आज इटलीमध्ये लेक कोमो येथे पार पडणार आहे

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा विवाहसोहळा आज इटलीमध्ये संपन्न होत आहे. या लग्नाकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले असून दोघांचेही चाहते या सोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. दीपिका बेंगलुरुची असल्याकारणाने कोंकणी पध्दतीने हा विवाह पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. या शाही लग्नसोहळ्यासाठी दीपिका आणि रणवीरने लेक कोमो वरील कास्टा डिवा रिसॉर्ट आणि स्पा बूक केले आहे. व्हिला दी बाल्बिआनेलोमध्ये दीप वीरचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

१३ व्या शतकातील या आलिशान व्हिला परिसरातील सुरक्षाव्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. पाहुण्यांनी सोहळ्याचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करू नये, यासाठी मोबाइलच्या कॅमेऱ्याला स्टिकर्स लावून झाकण्यात आले आहेत. तसेच ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे, शिवाय लेक कोमो परिसरात सुरक्षारक्षकांच्या बोटी गस्ती घालत आहेत. कास्टा दिवा रिसॉर्टमध्ये रणवीरसाठी तर व्हिला दी इस्टमध्ये दीपिकाच्या कुटुंबियांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच पाहुण्यांना खास रिस्ट बँड देण्यात आले आहे. ई-आमंत्रणामध्ये प्रवेशाकरिता स्कॅन करण्यासाठी QR कोड देखील दिला आहे.

- Advertisement -

काल दीपवीरचं संगीत पार पडलं. संगीतमध्ये शुभा मुदगल हीने गायन केले, तर रणवीरने त्याच्या गुंडे चित्रपटाच्या ‘तुने मारी एन्ट्रीया’ या गाण्यावर जोरदार एन्ट्री मारली. तसेच रणवीरने मेहंदीच्या वेळी दीपिकाला जेवण भरवण्याची जबाबदारी घेतली होती. त्याबदल्यात त्याने दीपिकाकडे किसची मागणी केली. दीपिकानेही ती मागणी पूर्ण केली!

उद्या त्यांचा ‘आनंद कराज’ पार पडणार आहे. सिंधी पध्दतीने हा विवाह संपन्न होईल. दोघांच्याही संस्कृतींचा सन्मान करत ते आज कोंकणी आणि उद्या सिंधी पध्दतीने लग्न करतील.

- Advertisement -

दीपिका आणि रणवीर ची प्रेम कहानी ‘गोलीयों की रास लीला-रामलीला’ या चित्रपटादरम्यान सुरूवात झाली. त्यानंतर त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ मध्ये एकत्र काम केले. सहा वर्षांच्या त्यांच्या या रोमान्स नंतर आत्ता ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

विवाहामध्ये दोघे ‘सभ्यसाची’ डिजायनर कपडे घालणार आहेत ही माहिती मिळाली आहे. प्रत्येकी ४००० युरोज म्हणजेच ३०,००० रूपयांचे ७५ रूम्स पाहुण्यांसाठी बूक केले आहेत. खास फॉरेन्स वरून १२ फ्लोरिस्ट्सना सजावट करण्यासाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

लग्नानंतर दीपिका आणि रणवीर पाहुण्यांसाठी दोन रिसेप्शन्स ठेवणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी बंगळूरूला आणि २८ नोव्हेंबरला मुंबईंमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -