घरमनोरंजनईशाच्या लग्नाला देसी गर्ल लावणार ठुमके?

ईशाच्या लग्नाला देसी गर्ल लावणार ठुमके?

Subscribe

इशा आणि प्रियांकाची मैत्री सर्वश्रुत आहे. अंबानी घराशी प्रियांकाचे जवळचे नाते आहे. कारण अंबानींच्या अनेक खासगी कार्यक्रमांना प्रियांकाची हजेरी असते.

रणवीर सिंग आणि दीपिकाच्या लग्नानंतर आता बीटाऊनमध्ये चर्चा आहे ती ईशा अंबानीच्या लग्नाची… १२ डिसेंबरला ईशा अंबानी आणि आनंद पिरामल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. पण त्या आधी एक भव्य संगीत सोहळा होणार असल्याचे देखील समजत आहे. या संगीत सोहळ्याला देसी गर्ल प्रियांका चोप्रा सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. आणि विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा तिची बेस्ट फ्रेंड ईशा अंबानीच्या संगीत सोहळ्यासाठी काही धमाकेदार सादर करणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

पाहा इशा अंबानीची महागडी लग्नपत्रिका 

प्रियांका करतेय तयारी ?

सध्या अशी देखील चर्चा आहे की ईशाच्या लग्नाच्या सोहळ्यांसाठी एक डान्स ग्रुप नृत्य सादर करणार आहे. त्या ग्रुपमध्येच प्रियांका असणार आहे असे देखील कळत आहे. सध्या या ग्रुपची जोरदार तयारी सुरु आहे.

- Advertisement -
वाचा –ईशा अंबानीच्या संगीत सोहळ्यात गाणार बियोन्से

बॅचलरेट पार्टीला ईशाची हजेरी

ईशा आणि प्रियांकाची मैत्री सर्वश्रुत आहे. अंबानी घराशी प्रियांकाचे जवळचे नाते आहे. कारण अंबानींच्या अनेक खासगी कार्यक्रमांना प्रियांकाची हजेरी असते. सप्टेंबर महिन्यात ईशा आणि आनंद पिरामल यांचा साखरपुडा इटलीमध्ये झाला. यावेळी देखील प्रियांका हजर होती. इटलीच्या लेक कोमो येथे हा शाही सोहळा पार पडला. शिवाय प्रियांका स्वत: २ डिसेंबरला राजस्थानमध्ये निक जोनाससोबत लग्न बंधनात अडकत आहे. त्याआधी पिग्गीने अॅमस्टरडॅमला बॅचलरेट पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी ईशा खास मुंबईहून तिच्या बॅचलरेट पार्टीला हजर होती.

वाचा- अंबानींची ईशा मिसेस पीरामल होणार

८ आणि ९ डिसेंबरला होणार ग्रँड पार्टी

लग्नापूर्वीच्या सोहळ्यासाठी अंबानी आणि पिरामल परीवार सज्ज असून ८ आणि ९ डिसेंबर रोजी जयपूरला एक ग्रँड पार्टी होणार आहे. या पार्टीला बीटाऊनमधील अनेक सेलिब्स हजेरी लावणार अशी माहिती देखील समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -