घरमनोरंजन'देवी' लघुपटाचा पोस्टर प्रदर्शित!

‘देवी’ लघुपटाचा पोस्टर प्रदर्शित!

Subscribe

'देवी' या आगामी लघुपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या लघुपटाचा टीझर २४ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री काजोलने ‘देवी’च्या टीझरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून आगामी लघुपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. ‘देवी’चा टीझर २४ फेब्रुवारी सोमवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. इन्स्टाग्रामवर काजोलने हे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे की, ‘नऊ असामान्य बहिणींच्या कथेवर आधारीत ही गोष्ट आहे. तसेच आमच्या शक्तिशाली लघुपटाचा टीझर २४ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे’.

- Advertisement -

या पोस्टरमध्ये काजोलसह नेहा धुपिया, श्रुति हासन, नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, संध्या म्हात्रे, रामा जोशी, शिवानी रघुवंशी आणि यशस्विनी दयामा या कलाकारांचा समावेश आहे. ‘देवी’चे दिग्दर्शन प्रियंका बॅनर्जी यांनी केले असून इलेक्ट्रिक एपल एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. गेल्या महिन्यात ‘देवी’चा पहिला लूक श्रुतीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तिने लिहिले, ‘या अविश्वसनीय महिलांसह माझा पहिला लघुपट!! मला याचा एक भाग बनवल्याबद्दल धन्यवाद’.

View this post on Instagram

A tale of nine women navigating through an unusual sisterhood thrust upon them by circumstance. The teaser of our powerful short film drops on 24th February 2020! @kajol @shrutzhaasan @nehadhupia @neenakulkarni @muktabarve @raghuvanshishivani @yashaswinidayama #SandhyaMhatre and #RamaJoshi Written & Directed by: @priyankabans @electricapplese @ashesinwind @ryanivanstephen @rumifiedritika for @indianstorytellers DOP: Savita Singh Production Design: @iyengar_sriram @sujeet.s.sawant Costume: @rohitrchaturvedi Publicity Design: @marchingants_ Publicists: @think_ink_communications ?: @subisamuel #Devi #shortfilm #electricapplesentertainment #Bollywood #YouAreADevi #safetyforwomen #Kajol #ShrutiHaasan #NehaDhupia #NeenaKulkarni #RoyalStagBarrelSelect #LargeShortFilms #MakeItPerfect #EAE

A post shared by @ shrutzhaasan on

- Advertisement -

या लघुपटाबद्दल बोलताना काजोल सांगते की, ‘देवी हा लघुपट विशेषत: आजच्या काळातील स्त्रियांशीच संबंधित आहे. या चित्रपटाचा मी एक भाग आहे याचा आनंदच आहे’, असे ती म्हणाली. तसेच, ‘माझ्या पहिल्या लघुपटासाठी मी यापेक्षा चांगला विषय निवडूच शकले नसते’, असेही ती म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -