घरमनोरंजन'रांझणा'फेम धनुष गाणार मराठी गाणं!

‘रांझणा’फेम धनुष गाणार मराठी गाणं!

Subscribe

अमोल पाडवे दिग्दर्शित ‘फ्लिकर’ या चित्रपटामध्ये धनुष मराठी गाणं गाणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

‘व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी’ हे गाणं ऐकलं की आपोआप आपले पाय ठेका धरतात. या गाण्याने अक्षरश:सगळ्यांना वेड लावलं! आणि ही किमया साधली सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुषने. या गाण्यामुळे धनुष रातोरात स्टार झाला. आता पुन्हा धनुष चाहत्यांसाठी खास सरप्राईझ घेऊन येत आहे. धनुष चक्क मराठी गाणं गाणार आहे.

‘फ्लिकर’मध्ये ऐका धनुषचा आवाज

अमोल पाडवे दिग्दर्शित ‘फ्लिकर’ या चित्रपटामध्ये धनुष मराठी गाणं गाणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटाचं संगीत बादशहा इलियाराजा यांनी दिलं आहे. धनुषच्या मराठी चाहत्यांना त्याने मराठीत गाणं गावं ही इच्छा होती. अखेर त्यांची इच्छा फ्लिकर’च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

- Advertisement -

गाण्याबाबत गुप्तता

मात्र धनुषने नेमकं कोणतं गाणं गायलं आहे याबाबत माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे. आता धनुष मराठी गाणं कसं गाणार? गाण्यासाठी तो मराठी शिकला का? असे अनेक प्रश्न सध्या धनुषच्या चाहत्यांना पडले आहेत. कारण धनुषचे सासरे रजनीकांत हे देखील मराठी भाषिक आहेत. मात्र त्यांना चांगलं मराठी बोलता येत नाही. त्यामुळे आता धनुष मराठी गाणं कसं गाणार हे बघणं उत्सुकतेचं आहे.

टॉलिवूडचा सुपरस्टार

धनुषने जरी एक गायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली असली, तर तो सध्या टॉलिवूडचा सुपरस्टार आहे. ‘रांझणा’ या हिंदी चित्रपटातून धनुषा अभिनेता म्हणून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला. लवकरच तो ‘वादा चेन्नई’ आणि ‘मारी-२’ या चित्रपटांत दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -