Video: …यासाठी पोहचले धर्मेंद्र शेतात

Mumbai
dharmendra farm house video viral again on social media
Video: ...यासाठी पोहचले धर्मेंद्र शेतात

चित्रपटापासून दूर असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आपल्या शेतात वेळ घालवतं आहेत. अनेकदा ते सोशल मीडियावर शेतातले व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी अजून एक शेतात व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी धर्मेंद्र हे शेतामधल्या पत्ता कोबीच्या आवारात दिसतं आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत शेतात काम करणारा व्यक्तीही दिसत आहे. त्या व्यक्तीला धर्मेंद्र नायक म्हणतं आहेत आणि चाहत्यांना सांगत आहेत की, ‘आमच्या शेतात पत्ता कोबी आला आहे.’

सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी असं लिहिलं की, ‘आ लौट के आजा मेरे मीत, तुझे तेरे खेत बुलाते हैं, लव्ह यू ऑल.’ या व्हिडिओत ते देसी अंदाजात दिसत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ७४ हजारपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी या व्हिडिओ पाहून खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धर्मेंद्र यांचं खरं नावं धरम सिंह देओल आहे. यांचं बालपण पंजाबमधील साहनेवालमध्ये गेलं असून त्यांचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते. १९६० मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘वर्ल्ड आयर्न मॅन’ हा अवॉर्ड त्यांना देण्यात आला आहे. धर्मेंद्र यांच्या लोकप्रिय चित्रपटामध्ये ‘सत्यकाम’, ‘खामोशी’, ‘शोले’, ‘क्रोधी’ आणि ‘यादों की बारात’ यांचा समावेश होतो.


हेही वाचा – ‘तान्हाजी’ चित्रपट दुसऱ्या आठवड्यात देखील हाऊसफुल