धर्मेंद्र झाले भावूक; म्हणाले, ‘कधी हसून घेतो तर कधी रडून’

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र भाऊक झाल्याचे दिसत आहेत.

New Delhi
Dharmendra
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर सध्या अॅक्टिव्ह राहायला लागले आहेत. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनवरुन धर्मेंद्र भावूक झाल्याची दिसत आहे. या कॅप्शनमध्ये ते म्हणाले की, ‘कधी सुख तर कधी दु:खी असतो. उदास होतो, गावाची आठवण येते. त्यामुळे कधी हसून घेतो तर कधी रडून घेतो.’ धर्मेंद्रनी शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी प्रचंड लाइक्स केले आहे. याशिवाय धर्मेंद्र यांच्या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?

धर्मेंद्र पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्म हाऊसला गेले आहेत. ते व्हिडिओमध्ये भावनिक झाल्याचे जाणवत आहेत. आपल्याला फॉर्म हाऊल आणि तो परिसर आवडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते व्हिडिओमध्ये चाहत्यांना आपण कसे आहात? असा प्रश्न विचारत आहेत. याशिवाय आपण ठिक असल्याचेही धर्मेंद्र म्हणाले आहेत.

 

View this post on Instagram

 

Kabhi khushi kabhi ghum , udaas hota hoon, gaon ko yaad kar leta hoon. Hans leta hoon ro leta hoon 🙏

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here