धर्मेंद्र यांचे ट्विटरवर पुनरागमन!

नकारात्मक प्रतिक्रियांना वैतागून त्यांनी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Mumbai

जेष्ठ अभिनेते धर्मेंद यांनी सोशलमिडीयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सतत नेटकऱ्यांकडून येणाऱ्य नकारात्मक प्रतिक्रीयाला कंटाळून त्यांनी हा निर्ण घेतला आहे. दोन वर्षांपूर्वीच धर्मेंद्र यांनी ट्विटरवर पदार्पण केलं होतं. मात्र ट्रोलर्सच्या नकारात्मक प्रतिक्रियांना वैतागून त्यांनी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांनी ट्विट करत आपला निर्णय सांगितला आहे.
‘मित्रांनो, मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. मी एका छोट्याशा वाईट कमेंटनेही दुखावलो जातो. कारण मी अत्यंत संवेदनशील व भावूक व्यक्ती आहे. मी यापुढे तुम्हाला आणखी त्रास देणार नाही,’ अशी पोस्ट लिहित त्यांनी ट्विटर सोडलं.

पण धमेद्र यांनी ट्विटर सोडू नये त्यांनी पुन्हा सोशलमिडीयावर याव यासठी चाहत्यांनी त्यांना विनंती केली आहे. आणि चाहत्यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी ट्विटरवर पुरागमनही केलं आहे. ‘तुमच्या प्रतिक्रिया वाचून मन भरून आलं. तुमच्या प्रेमासाठीच मी अभिनेता झालो,’ असं त्यांनी नव्या ट्विटमध्ये लिहिलं.