Friday, September 18, 2020
27 C
Mumbai
Advertisement

कंगना रणावत आज मुंबईत दाखल होणार आहे. गेले काही दिवस शिवसेना –कंगनामध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादानंतर कंगनाचे आज मुंबईत येणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय मला आडवून दाखवा असे आव्हान तीने या आधीच केलं होतं. त्यामुळे आज कंगनाच्या मुंबईत येण्याकडे लक्ष लागले आहे. विमानाने मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पालिकेच्या सुधारित आदेशांनुसार १४ दिवस विलगीकरणात राहावेच लागेल. सर्वासाठी नियम समान आहे. त्यातून सूट हवी असल्यास सरकारी अधिकाऱ्यांनी अर्ज करावा, असं महापौरांनी स्पष्ट केलं होतं. त्यावरून आता भाजपनं टोला लगावला आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेता अमिक खानचा संदर्भ देत महापौर किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरवरून महापौरांना टोला लगावला आहे.

“कंगना बाहेरून विमानाने येणार म्हणून तिला क्वारंटाइन करणे अनिवार्य असल्याचं मुंबईच्या महापौरांनी सांगितलं. परंतु अमिर खान तुर्कस्थानाहून अल्लाउद्दीनच्या चटईवर बसून मुंबईत आला होता का?,” असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या….

किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, “पालिकेनं जारी केलेल्या सुधारित नियमानुसार विमानाने मुंबईत येणाऱ्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवावे लागणार आहे. या प्रवाशांना पालिकेने सुविधा उपलब्ध केलेल्या ठिकाणी किंवा स्वत:च्या घरी १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. विलगीकरणाच्या नियमातून सरकारी अधिकाऱ्यांना सूट हवी असल्यास दोन दिवस आधी अर्ज करावा लागेल.


हे ही वाचा – कंगनाच्या बंगल्यावर हातोडा, कंगनाने दिली ‘बाबर’,’पाकिस्तानची’ उपमा!