दिव्यांग चाहत्याच्या गायकीवर शाहरुख झाला फिदा!

शाहरुखनेसुद्धा त्या दिव्यांग चाहत्याच्या गायनाची प्रशंसा करत त्या चाहत्याला खूप सारे प्रेम म्हणून संदेश पाठवला.

New Delhi
SRK1 to fan

बॉलीवूडकरांचे चाहते त्यांच्या भेटीसाठी सतत विविध क्लृप्त्या शोधत असतात. बॉलीवूड सेलिब्रिटींच्या लक्षात राहण्यासाठी त्यांचे चाहते सतत प्रयत्नरत असतात. त्यासाठी हे चाहते सोशल मीडियाचादेखील पुरेपूर वापर करतात. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा चाहता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील गाणे गुणगुणत आहे. विशेष म्हणजे, शाहरुखचा हा चाहता दिव्यांग आहे. त्यामुळे ट्विटरवरील एका चाहत्याने शाहरुखच्या या चाहत्याचा व्हिडिओ ट्विट करुन शाहरुखला त्याला भेटण्याची विनंती केली आहे. यावर शाहरुखनेसुद्धा त्या दिव्यांग चाहत्याच्या गायनाची प्रशंसा करत त्या चाहत्याला खूप सारे प्रेम म्हणून संदेश पाठवला.

दोन दशकांनंतरही चित्रपटाची मोहिनी कायम

व्हायरल व्हिडिओ मध्ये दिव्यांग राजू शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सुपरडूपर हिट चित्रपटातील तुझे देखा तो ए जाना सनम.. या गाण्याची लिपसिन्सिंग करत आहे. शाहरुख खान आणि काजोल यांची प्रमुख भूमिका असलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाला दोन दशकं झाली आहेत. मात्र तरीही आजसुद्धा या चित्रपटाची मोहिनी कमी झालेली नाही. या चित्रपटातील उत्कृष्ट संगीताला या यशाचे श्रेय देण्यात येते.