घरमनोरंजननानावर केलेल्या आरोपाला राकेश सारंगचं उत्तर

नानावर केलेल्या आरोपाला राकेश सारंगचं उत्तर

Subscribe

दहा वर्षापूर्वी हॉर्नओके प्लिजच्या शूटींगदरम्यान नाना पाटेकरने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. त्यावेळी कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि चित्रपटाचा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी हा प्रकार पाहिला होता. मात्र त्यांनी त्याला रोखण्याचा प्रकार केला नाही. असा आरोपही तनुश्रीनं लावला होता. यावर राकेश सारंगने उत्तर दिलं आहे. तनुश्री काही वर्षांपासून बॉलिवूपासून लांब राहिली आहे. तिला पुन्हा चित्रपटसृष्टीत काम मिळवायचं आहे. त्यामुळेच ती अशी बिनबुडाचे आरोप नाना पाटेकर वर करत असल्याचं राकेशने म्हटलं आहे.

नथनी उतारो असे शब्द असलेलं हे गाणं, तिच्या एकटीचं नव्हतं. या गाण्यात एका पुरुषाचा आवाजही आहे. मग हे गाणं फिमेल साँग आणि केवळ तिच्याच नृत्याचं असल्याचं ती कोणत्या आधारावर म्हणतेय, हे कळत नाही. हे एक युगुल गीत होतं. नाना पाटेकरने तिच्या नृत्याला प्रोत्साहन दिलं होतं. पण तिने त्याचा वेगळा अर्थ काढला. जर एखाद्याला तुमच्याशी काही वावगं वागायचं असेल तर तो सेटवर चारशे ते पाचशे लोकांसमोर असले प्रकार करणार नाही. तो संबंधित महिलेला निर्जन स्थळी बोलावतो कारण त्याला आपली नाचक्की होईल अशी भिती असते. नानाने असलं काहीही केलेले नाही.

- Advertisement -

तनुश्रीनं असंही सांगितलं होतं की काही राजकीय पक्षाच्या लोकांनी नानाच्या सांगण्यावरू तिच्या गाडीची मोडतोड केली. त्यातही तथ्य नसल्याचं राकेशनं स्पष्ट केले आहे. यावेळी तनुश्रीनं नानाविरोधात सिने अ‍ॅन्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनकडे तक्रारही केली होती. मात्र त्यांनी हे प्रकरण मिटवल्याचे तिचे म्हणणे आहे. जर तनुश्री ही गोष्ट उकरण्याचा प्रयत्न करत असेल तर नानाने कायदेशीर कारवाई करायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -