कंगना महाराष्ट्राची पुढील मुख्यमंत्री होईल…; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे वक्तव्य

मुंबई महापालिकेने ऑफिसवर कारवाई केल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत संतप्त झाली. तिने शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट निशाणा साधला. शिवाय आधीपासूनच कंगना बॉलिवूडला सातत्याने टार्गेट करत आली आहे. त्यामुळे आता बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कंगना ही महाराष्ट्राची पुढची मुख्यमंत्री होईल, असं दिसतं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यासंबंधी राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले असून त्यांनी म्हटले आहे की, कंगना नक्कीच महाराष्ट्राची पुढील मुख्यमंत्री होईल असं दिसतं आहे आणि असं झालं तर सर्व बॉलिवूडवासियांना TIMBEKTOO मध्ये स्थलांतरित व्हावं लागेल.

 

कंगनाने पालिकेच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना लक्ष्य केले. तू जे केलं ते चांगलं केलं. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुझं घमेंड तुटेल. काश्मिरी पंडितांवर काय परिस्थिती आली असेल, याचा अंदाज आज मला आला. अयोध्येवर चित्रपट करेन, काश्मीरवरही करेन. माझ्याबरोबर आज जे झालं, ते चांगलंच झालं, अशी प्रतिक्रिया कंगनाने व्हिडिओच्या माध्यमातून दिली.

मुंबई महापालिकेच्या या कारवाईस सुरूवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने हे पाकिस्तान आहे असे म्हटले आहे. मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता PoK झाली आहे, असे ट्वीट तिने केले. कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने ही बाबरची सैन्य असल्याचे म्हटले.

हेही वाचा –

महानगरच्या वृत्तानंतर बेस्टच्या फुकट्या प्रवाशांना बसणार आळा