घरमनोरंजनदिव्यांगांचा संयुक्त डे झकास conjunct

दिव्यांगांचा संयुक्त डे झकास conjunct

Subscribe

भारतात सर्व जातीधर्माचे लोक एकत्र राहतात म्हटल्यानंतर बर्‍याचशा आयोजकांनी यातून मार्ग काढून शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव संयुक्तपणे साजरा करणे महत्त्वाचे मानलेले आहे. दीपोत्सव, नाताळ यासारखे सण संयुक्तपणे साजरे होत आहेत. अलिकडे सणांइतकेच साजर्‍या केल्या जाणार्‍या ‘डे’ चे महत्त्वही वाढलेले आहे. आत्ताचा आणि नंतरचा आठवडा लक्षात घेतला तर यात प्रामुख्याने रोझ डे, चॉकलेट डे यांच्याबरोबर व्हॅलेंटाईन डे ची चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली असेल; पण तो संयुक्तपणे साजरा करण्याची तयारी कोणी दाखवली नाही. ‘इंग्रजी धाबा’ आणि ‘मुस्कान फाऊंडेशन’ ने मात्र संयुक्तपणे हा डे साजरा केला. त्यातही वैशिष्ट्य होते, ते म्हणजे अशा आनंदापासून दिव्यांग मुलं ही लांबच असतात. अशा शंभर दिव्यांगांना या संयुक्त डे ला निमंत्रित केले होते. त्यामुळे हा संयुक्त डे त्यांच्यासाठी झक्कास ठरला.

भेटवस्तू देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असला तरी या दिव्यांगांना नृत्य, गाणी यांचासुद्धा आनंद घेता यावा यासाठी संस्थेने तशा कार्यक्रमाची रचना केली होती. आवडीच्या गीतांचा या दिव्यांगांनी मनमुराद आनंद घ्यावा, कलात्मक दृष्टिकोनातून ठेवलेल्या वस्तू त्यांनी हाताळाव्यात हाही त्यापाठीमागचा उद्देश होता. सहपरिवार सहभोजनाचा आनंद दिव्यांगांबरोबर त्यांच्या पालकांनाही इथे घेता आला. विशेष म्हणजे ‘सैराट’ मधील झिंगाट या गाण्याने दिव्यांगांना नाचायला, डोलायला लावले होते. प्रसाद लाड, राज सडविलकर, दिप्ती गांधी, संजय गांधी, वैभव वाघ, अरुण टंकर हे विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्याचे साक्षीदार होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -