Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अर्जुन रामपालच्या बहिणीला NCBचा समन्स

अर्जुन रामपालच्या बहिणीला NCBचा समन्स

अर्जुनच्या बहिणीलाही एनसीबीने समन्य बजावला आहे. अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबी कडून चौकशी सुरू आहे. त्यातच आता त्याच्या बहिणीलाही एनसीबीने समन्स बजावला आहे. अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. दोन वेळा त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला देमेत्रिएड हिचीही एनसीबीने चौकशी केली. अर्जुनचा ड्रायवर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा भाऊ यांनाही एनसीबीने ड्रग्ज प्रकरणार अटक केली आहे. दोघांकडे आम्ली पदार्थ मिळाल्याचे एनसीबीने सांगतिले.

असे सांगितले जात आहे की, पहिल्यांदा अर्जुन एनसीबीसमोर हजर झाला. त्यानंतर त्यावेळी त्याच्या बोलण्यामध्ये काही विरोधाभास जाणवला. म्हणून एनसीबीने अर्जुनच्या घराची झडती घेतली. त्यावेळी अर्जुनच्या बहिणीलाही एनसीबीने समन्स बजावला आहे. अर्जनने सांगितले आह की, मी एनसीबीला एक विशेष वेदनाशमक औषधांचे पिस्क्रिप्शन दिले आहे. हे औषध दिल्लीच्या मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेले आहे.त्यांनी कोणत्याही ड्रग्ज घेण्यासाठी सांगतले नाही.

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडचे ड्रग्ज प्रकरण समोर आले. आतापर्यत एनसीबीने अनेक बॉलिवूडला कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. बऱ्याच जणांची एनसीबीकडून चौकशीही करण्यात आली आहे. आतापर्यत २३ लोकांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – तब्बल २५ वर्षानंतर राज्यसरकारला जाग, Michael Jackson च्या शो साठीचा कर परत देणार

- Advertisement -