घरमनोरंजन'ड्राय डे'लाही होणार 'दारू डिंग डांग'

‘ड्राय डे’लाही होणार ‘दारू डिंग डांग’

Subscribe

ड्राय डे सिनेमातील दारू डिंग डांग गाणं नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेम, ब्रेकअप आणि दारू पिऊन होणारी धमाल या चित्रपटातून पाहायाला मिळणार आहे.

गाणं वाजलं की आपली पावलं आपसुक थिरकतात. मग निमित्त असो की नसो.नत्यानंतर सुरू होते ती गाण्यांची फर्माईश! ‘ए बजाव’ म्हणत मनसोक्त नाचण्याची मजा काही औरंच! नाही का? त्यात ‘वन्स मोर’ म्हणत ‘झिंगाट’ होऊन नाचण्यात अनेकजण तरबेज. आता अशीच ‘फुल्ल टू धमाल’ करण्यासाठी तुमच्या-आमच्या लिस्टमध्ये आणखी एका गाण्याची भर पडली आहे. १३ जुलैला ‘ड्राय डे’ हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्यातील ‘दारू डिंग डांग’ गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्याचे पाहायाला मिळत आहे.

कसा आहे ड्राय डे

नुकतेच ड्राय डे सिनेमातील ‘दारू डिंग डांग’ हे गाणं सोशल नेटवर्कींग साईटस आणि टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याला चांगलीच पसंती मिळत आहे.जय अत्रे यांनी हे गाणे लिहिले आहे. प्रेम, ब्रेकअप आणि मग दारू पिऊन होणारी धमाल ही या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

- Advertisement -

विशाल दादलानी यांनी हे गाणं गायले आहे. पांडुरंग जाधव यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात चिन्मय कांबळी, मोनालिसा बागल, अरुण नलावडे, पार्थ घाडगे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -