घरमनोरंजनरॉकने दिल्या प्रियांका आणि नीकला शुभेच्छा

रॉकने दिल्या प्रियांका आणि नीकला शुभेच्छा

Subscribe

प्रियांका आणि नीक यांची पहिली भेट वॅनिटी फेअर ऑस्कर पार्टीमध्ये झाली. मेट गाला २०१७ ला त्या दोघांनी पहिला पब्लिक अपिअरंस दिला.

प्रियांका फायनली प्रियांका नीक जोन्स झालेली आहे. तिने तिचे लग्नातील फोटो फायनली तिच्या फॅन्ससाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोजवर आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडमधून या शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. हॉलीवूडमधील प्रियाकांचा अगदी जवळचा मित्र रॉक म्हणजेच अभिनेता ड्वेन जॉन्सन याने देखील प्रियांकाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाने तिचा इन्स्टावर फोटो शेअर केल्यानंतर ड्वेनने तिला लग्नाच्या शुभेच्छा देत तुझ्या लग्नामुळे आनंदी असल्याचे म्हटले आहे.

पाहा- प्रियांका-निकच्या लग्नाचा फोटो अल्बम आला हो…!

पाहा- प्रियांकाचा अंदाज

 

View this post on Instagram

 

Once upon a fairytale… @nickjonas Link in bio @people

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

- Advertisement -

ड्वेन प्रियांकाचा खास मित्र

हॉलीवूडमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर प्रियांकाने अनेक हॉलीवूडपटातून काम केले आहे. तिने बे वॉच या सिनेमातून रॉकसोबत काम केले. प्रियांकाच्या लग्नासाठी ड्वेन खास जोधपूरला येणार अशी चर्चा रंगली होती. पण जोधपूरमध्ये दोन दिवस चाललेल्या सोहळ्याला तो कुठेच दिसला नाही. पण त्याने लग्नाला हजेरी लावली नसली तरी त्याने त्यांना शुभेच्छा मात्र आवर्जून दिल्या आहेत.

<

 

View this post on Instagram

 

And forever starts now… ❤️ @nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

- Advertisement -

h5>वाचा- प्रियांका – निक जोधपूरहून झाले रवाना

प्रियांका आणि नीकसोबत केले काम

प्रियांका आणि नीकसोबत ड्वेनने या आधीही काम केले आहे. बे वॉच या सिनेमात ड्वेनने प्रियांकासोबत आणि नीकसोबत जुमांजीमध्ये काम केले. त्यामुळे एका मुलाखतीत ड्वेनने त्याच्या नात्याचे क्रेडीट मला जाते अशा संदर्भातील विधान केले होते.

पाहा प्रियांका- नीकचा रोमँटिक अंदाज

अशी जमली जोडी

प्रियांका आणि नीक यांची पहिली भेट वॅनिटी फेअर ऑस्कर पार्टीमध्ये झाली. मेट गाला २०१७ ला त्या दोघांनी पहिला पब्लिक अपिअरंस दिला. पण मिळालेल्या माहितीनुसार या वर्षापासून त्यांच्या खऱ्या नात्याला सुरुवात झाली आणि आता ते लग्नबंधनात अडकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -