घरलोकसभा २०१९जरा हटकेमोदींचा बायोपिक पुन्हा वादात,निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

मोदींचा बायोपिक पुन्हा वादात,निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.अख्तर यांनी यसंबधीत माहिती ट्विटरवर देत आक्षेप घेतला होता. या वादानंतर आता पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादात सापडला आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या पोस्टर ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर यांचे नाव वापरले आहे. जावेद अख्तर यांनी चित्रपटासाठी काम केले नसले तरीही त्याचे नाव वापरले गेले. अख्तर यांनी यसंबधीत माहिती ट्विटरवर देत आक्षेप घेतला होता. या वादानंतर आता पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

- Advertisement -

आता या बायोपिकच्‍या निर्मात्‍यांना दिल्लीच्‍या मुख्य निवडणूक कार्यालयाने नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाचे म्‍हणणे आहे की, हा चित्रपट निवडणूक आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करतो. याआधी ‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिकचे प्रोडक्शन हाऊस, म्युझिक कंपनी आणि दोन वृत्तपत्रांना नोटीस पाठवण्‍यात आली होती.

पीएम नरेंद्र मोदी बायोपिक निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करते. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकार्‍याने सांगितले आहे की, संबंधित चित्रपट निर्मात्‍यांकडे उत्तर मागितले असून त्‍यांना उत्तर देण्‍यासाठी ३० मार्चपर्यंत वेळ देण्‍यात आली आहे.

- Advertisement -

या आधी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये झालेल्या चुकीला लोकांनी ट्रोल केले होते. पीएम मोदींच्या बायोपिकमध्ये झालेल्या चुकीबद्दल जेष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांनीही राग व्यक्त केला आहे. जावेद अख्तर बरोबर शबाना आझमी यांनीही ट्विट करुन आपला राग व्यक्त केला आहे. जावेद अख्तर यांचे नाव जाणूनबुजून वापरले गेले असल्याचा आरोप शबाना आझमी यांनी केला आहे. या बायोपिकची रिलीज डेट १२ एप्रिल होती. आता हा बायोपिक ५ एप्रिलला रिलीज होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -