आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गायक एड शीरन याने गांजा सोडल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. त्याच्या फॅन्सने या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर एड शीरनचे कौतुक केले जात आहे. गांजाच्या नशेबद्दल उघडपणे आपली चुकी कबुल केली आहे. यापुढे आपण नशेच्या आहारी न जाता कलेवर लक्ष केंद्रीत करु असे शीरन म्हणाला आहे. “गांजाचे सेवन करण्यापासून मी स्वतःला थांबवले आहे. मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.” असे त्याने लिहिले आहे. एड शीरन याचे गाणे जगभरात प्रसिद्ध आहेत.
- Advertisement -
भारतात केला होता शो
आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गायक एड शीरन शो साठी भारतात आला होता. मुंबईतील जीओ गार्डनमध्ये त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला होता. या शोला एड शीरनच्या फॅन्सनी एकच गर्दी केली होती.