अंडरवर्ल्ड जगतावर आधारीत आणखी एक वेबसीरिज; ‘एक थी बेगम’!

एक थी बेगम ही या वेबसीरीजचे ट्रेलर लाँच नुकतेच झाले असून हीदेखील अंडरवर्ल्ड जगतावर आधारीत वेबसीरीज असल्याचे दिसून येते.

Mumbai
ek thi begum
एक थी बेगम

सध्या घरामध्येच लॉकडाऊन असलेल्या लोकांसाठी मनोरंजनाची साधनंच उपयोगी पडत आहेत. टीव्हीवरील मालिका आणि बातम्या पाहून कंटाळलेले प्रेक्षक आपल्या आवडीच्या वेबसीरीजकडे लगेच वळतात. त्यातही एखादी वेबसीरीज अॅक्शन आणि रहस्यमय असेल तर प्रेक्षकांची उत्सुकताही ताणून राहते. अशीच एक खळबळजनक वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एक थी बेगम ही या वेबसीरीजचे ट्रेलर लाँच नुकतेच झाले असून हीदेखील अंडरवर्ल्ड जगतावर आधारीत वेबसीरीज असल्याचे दिसून येते. नायिकेच्या अवतीभवती फिरणारी कथा या सीरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून मराठी अभिनेत्री अनुजा साठ्ये हिने यात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. मॅक्स प्लेअरवर ही वेबसीरीज ८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

काय आहे कथानक 

आता सुरू असलेल्या वेबसीरीजच्या ट्रेंड प्रमाणेच एक थी बेगमध्येही फुल ऑन ड्रामा, अॅक्शन, रोमान्स आणि बोल्ड सीनची भरमार आहे. सध्या वेबसीरीजचा हा युएसपीच झालेला आहे. एक प्रेमी जोडी, प्रियकराचा खून आणि प्रेयमीकडून त्याच्या खुनाचा बदला ही या मागची साधारण स्टोरी आहे. मात्र अतिशय रंज पद्धतीने ते प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहे. अनुजा साठ्ये हिने नेहमीपेक्षा वेगळा असा बोल्ड अंदाज दाखवला आहे. तर अंडरवर्ल्डचा १९८६ चा काळ दाखवण्यात आल्यामुळे ओघाने मुंबई आणि मुंबईतील मराठी कॅरेक्टर्स हेही यात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही वेबसीरीजदेखील हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच या ट्रेलरने वाढवली आहे. त्यामुळे ही वेबसीरीज कशी असेल ते तर ८ तारखेनंतरच प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवरून समजेल.

हेही वाचा –

चीन सुधारणार नाही; इटलीने मदत म्हणून दिलेले पीपीई त्यांनाच विकतंय!