बिग बॉसच्या घरात मुन्ना भैया आणि एकता कपूरची एंट्री

ekta kapoor and divyenndu to visit bigg boss 14 salman khan show first time
बिग बॉसच्या घरात मुन्ना भैया आणि एकता कपूरची एंट्री

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय शो बिग बॉस सीझन १४ सध्या कॅप्टन्सी टास्कमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कॅप्टन्सीमुळे बिग बॉसच्या घरात गोंधळ सुरू आहे. पण आता बिग बॉसच्या घरात मिर्झापूर मधील मुन्ना भैया म्हणजे अभिनेता दिव्येंदु शर्मा आणि निर्माती, दिग्दर्शिका एकता कपूर प्रवेश करणार आहे. हे दोघे बिग बॉस सदस्य म्हणून घरात येत नसून ते एका टीव्ही सीरिजच्या प्रमोशनसाठी येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

पहिल्यांदा एकता कपूर बिग बॉस घरात दिसणार आहे. दिव्येंदु शर्मा आणि एकता कपूर यांची आगामी टीव्ही सीरिज ‘बिच्छु का खेल’च्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या टीव्ही सीरिजचे प्रमोशन करण्यासाठी दिव्येंदु आणि एकता बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. दरम्यान बिग बॉसच्या सेटवर हे यापूर्वी देखील आले आहेत, पण पहिल्यांदा ते बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सध्या बिग बॉसचे चाहते यासाठी खूप उत्साहित दिसत आहेत. आता बिग बॉसमध्ये हे दोघे कोणत्या नव्या अवतारात दिसणार आहेत? की फराह खान सारखे ते पण सदस्यांना टास्क देताना दिसतील? हे येत्या काळात कळेल.

‘बिच्छु का खेल’ ही सीरिज १८ नोव्हेंबरला आल्ट बालाजीवर प्रदर्शित झाली आहे. आता या सीरिजचे प्रमोशन करण्यात एकता सलमान खानच्या शोमध्ये येणार आहे. या सीरिजमध्ये दिव्येंदु व्यतिरिक्त अंशुल चौहान, जीशान क्वादरी, सत्यजीत शर्मा, राजेश शर्मा, गगन आनंदर आणि अभिनव आनंद दिसणार आहेत.

दरम्यान ३ ऑक्टोबर २०२० पासून बिग बॉस नव्या सीझनला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदस्यांमधील प्रेम आणि भांडणं चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत आणि चर्चेत आले आहेत.


हेही वाचा – सलमान कोरोना निगेटिव्ह, आता पुन्हा एकदा बिग बॉसचा होस्ट