‘सीरिअल किसर’ इमरानचा चित्रपट होणार रिलीज!

इमरान हाशमीचा वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चित्रपट टायगर्स आता भारतात रिलीज होणार आहे. झी ५वर येत्या २१ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होईल.

Mumbai
Emraan Hashmi New Movie Tigers
इमरान हाशीचा नवा चित्रपट टायगर्स

बॉलिवूडमध्ये सीरिअल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हश्मीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका बोल्ड विषयावर आधारित चित्रपट घेऊन इमरान प्रेक्षकांसमोर येत आहे. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर इमरानचा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात इमरानने एका पाकिस्तानी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘टायगर्स’! इमरान हश्मीचा चित्रपट म्हटलं की त्यात अनेक बोल्ड सीन असणारच असा आतापर्यंतचे चित्रपट बघून तुम्ही अंदाज लावला असेल तर तुमचा अंदाज फोल ठरणार आहे. या चित्रपटात बोल्ड सीन नाहीयेत. तर केवळ हा चित्रपट एका बोल्ड विषयावर आधारीत आहे.

भारतात चित्रपटाला विरोध

इमरानने पाकिस्तानी व्यक्तीची भूमिका साकारली असल्यामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नव्हता. मात्र आता ‘टायगर्स’ हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘झी ५’ वर येत्या २१ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होईल. त्यामुळे आता इमरानच्या चाहत्यांना नाराज होण्याची आवश्यकता नाही.

‘नो मॅन्स लॅण्ड’ दिग्दर्शकाचं दिग्दर्शन!

‘टायगर्स’ या चित्रपटात इमरानने पाकिस्तानी सेल्समनची भूमिका साकारली आहे. यात इमरान सत्यासाठी लढताना दिसणार आहे. डेनिस तानोविक यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. डेनिस यांच्या ‘नो मॅन्स लॅण्ड’ या चित्रपटाला ऑस्कर मिळाला होता. इमरान बरोबर सुप्रिया पाठक, सत्यदीप मिश्रा, आदिल हुसैन यात दिसणार आहेत. अनेक चित्रपट महोत्सवांत या चित्रपटाची प्रशंसा झाली होती.


तुम्ही पाहिलात का? – Video: रितेश देशमुखच्या ‘माऊली’चा टिझर!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here