चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! यशराजचे चित्रपट पाहा फक्त ५० रुपयांत!

ENTERTAINMENT You Can Watch YRF Movies For Rs 50 At Theatres This Diwali
चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! यशराजचे चित्रपट पाहा फक्त ५० रुपयांत!

यशराज फिल्मनं यावर्षी चित्रपट निर्मितीत ५० वर्ष पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने त्यांनी चित्रपटप्रेमींना अनोखं दिवाळी गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे या दिवाळीच्या काळात यशराज फिल्मचे जुने चित्रपट फक्त ५० रुपयांत पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे यानिमित्ताने पीव्हीआर (PVR) सिनेमा, आयनॉक्स (INOX) आणि सिनेपोलिस (CINEPOLIS) असे तीन मोठ्या मल्टिप्लेक्स चेन एकत्र येत आहेत. यशराज फिल्मच्या या गिफ्टमुळे चित्रपटगृहांमध्ये पुन्हा जुने चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

हे चित्रपट पाहता येणार

या दिवाळीत यशराज फिल्मने ज्या चित्रपटांना मोफत दाखवण्याची परवानगी दिली आहे, त्यामध्ये ‘एक था टायगर’, ‘बंटी और बबली’, ‘सिलसिला’, ‘जब तक है जान’, ‘दम लगा के हैशा’, ‘सुलतान’, ‘रब ने बना दी जोडी’, ‘बँड बाजा बारात’, ‘मर्दानी’, ‘दिल तो पागल है’, ‘वीरा जारा’ या चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. हे चित्रपट पाहण्यासाठी लोकांना फक्त ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

कोरोनामुळे यावर्षी फिल्म इंडस्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले ७ महिने चित्रपटगृह, नाट्यगृह बंद होते. यामुळे फिल्म इंडस्ट्रीला ३ हजार ५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पण आता १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण अजूनही प्रेक्षकांची हवी तेवढी दाद मिळत नाही आहे. त्यामुळे यशराज फिल्मने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आणण्यासाठी हा अनोखा प्रयत्न केला आहे.


हेही वाचा – आई झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्लॅमरस अंदाजात दिसली सपना चौधरी; फोटो व्हायरल