Good News! अभिनेत्री ईशा देओलने दिला मुलीला जन्म; ठेवले ‘हे’ नाव

ही आंनदाची बातमी तिने मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना कळवली.

Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलच्या घरी सोमवारी १० जूनला एका लहान पाहूण्याला जन्म दिला आहे. अभिनेत्री ईशा देओलला कन्यारत्न प्राप्त झाले असून ही आंनदाची बातमी तिने मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना कळवली.

ईशाने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत एक फोटो शेअर करत सांगितले की, मिराया तख्तानी हा कन्यारत्नाचा जन्म १० जूनला झाला. ईशाने आता दूसऱ्या मुलीला जन्म दिला असून पहिली राध्या नावाची मुलगी आहे. सोशल मीडियावर ही Good News शेअर करताच तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरवात केली आहे.

या पुर्वी ही राध्याचा जन्म झाल्याची बातमी ईशाने तिच्या चाहत्यांसह २० नोव्हेंबर २०१७ रोजी सोशल मीडियावर शेअर केली होती.

ईशा देओल सोशल मीडियावर जास्तकरून इंस्टाग्रामवर अॅक्टीव असते. २०१२ मध्ये बिझनेसमन भरत तख्तानी सोबत विवाह झाला होता.

View this post on Instagram

…..and she’s 1 month today ❤️🙏🏼

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here